NMC News : थकबाकीदारांसाठी महापालिकेची अभय योजना; पालकमंत्र्यांच्या सूचनेनंतर अंमलबजावणीचा निर्णय

NMC News : शंभर टक्के करवसुलीसाठी महापालिकेने लागू केलेली करसवलत योजना संपुष्टात आली आहे.
nmc
nmc esakal
Updated on

नाशिक : शंभर टक्के करवसुलीसाठी महापालिकेने लागू केलेली करसवलत योजना संपुष्टात आली आहे. थकबाकीची जवळपास १७३ कोटी वसुल करण्यासाठी जवळपास पावणेचार लाख थकबाकीदारांना नोटिसा पाठविण्याची तयारी सुरू झाली. परंतु दुसरीकडे मालमत्ता करावरील दंडमाफीसाठी योजना राबविण्याच्या सूचना पालकमंत्री दादा भुसे यांनी दिल्यानंतर एक ऑक्टोबरपासून महापालिका क्षेत्रात योजना लागू केली जाणार आहे. (Decision to implement Municipal Corporation Abhay Yojana for defaulters after instructions)

योजनेच्या माध्यमातून ७५ ते ९५ टक्के माफी मिळणार असल्याने महापालिकेचे आर्थिक नुकसान होणारे असले तरी दुसरीकडे थकबाकीच्या आकडेवारीत दाखविल्या जाणाऱ्या वार्षिक शास्तीचा फुगवटादेखील कमी होणार आहे. उत्पन्नाच्या बाजूंत ग्राह्य धरली जाणारी, परंतु प्रत्यक्षात वसुलीत जर-तर असलेली जमेची बाजू संपुष्टात येणार आहे. मालमत्ता करातून महापालिकेला मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळते. मात्र वसुली किती प्रमाणात व कशी होते, यावर सर्व महसूल प्राप्तीचे गणित अवलंबून असते.

घरपट्टी किंवा मालमत्ता कर शंभर टक्के वसूल होण्यासाठी महापालिकेने २०१६ पासून त्रैमासिक कर सवलत योजना लागू केली आहे. त्याअंतर्गत एप्रिलमध्ये एकरक्कमी मालमत्ता कर अदा केल्यास आठ, तर मे महिन्यात पाच, व जूनमध्ये तीन टक्के सवलत आहे. त्याचबरोबर सौरऊर्जेवर चालणाऱ्या साधनांचा वापर केल्यास एक टक्का सवलत आहे. त्याचप्रमाणे ऑनलाइन कर अदा करणाऱ्यांनादेखील तितकीच सवलत आहे.

सवलत योजनेत दोन लाख ३६ हजार ३९६ मिळकतधारकांनी १०० कोटी २५ लाख रुपये महापालिकेच्या तिजोरीत या वर्षी जमा केले. जूनमध्ये सवलत योजना संपुष्टात आली. त्यामुळे आता मिळकतधारकांना थकबाकी भरताना दरमहा दोन टक्के शास्ती लागू होणार आहे. त्यासाठी सव्वादोन लाख थकबाकीदारांना जप्तीच्या नोटिसा बजावण्याची तयारी करण्यात आली. परंतु पालकमंत्री दादा भुसे यांनी शास्ती रक्कम कमी करून अभय योजना लागू करण्याच्या सूचना दिल्यानंतर अंमलबजावणीचा निर्णय घेतला. (latest marathi news)

nmc
NMC News : ‘तो’ आदेश रद्द, 109 दुकानदारांना दिलासा! द्वारकावरील महापालिका जागेबाबत उच्च न्‍यायालयाचा निर्णय

अशी आहे योजना?

ऑक्टोबर व नोव्हेंबरमध्ये माफीची ५ टक्के रक्कम अदा केल्यास ९५ टक्के माफी, डिसेंबरमध्ये १५ टक्के माफीची रक्कम भरल्यास ८५ टक्के माफी तर, जानेवारी २०२५ मध्ये २५ टक्के माफीची रक्कम अदा केल्यास ७५ टक्के शास्ती माफी अशी योजना आहे.

''थकीत कर व त्यावरील शास्ती (दंड) वसुलीसाठी अभय योजना अमलात आणण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार कारवाई होत आहे.''- दादा भुसे, पालकमंत्री, नाशिक.

''थकीत करावरील शास्ती माफीबरोबरच करयोग्य मूल्यदरात वाढीचा प्रस्ताव मागे घेण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. शास्ती माफीसाठी अभय योजना सुरु होत आहे.''- अजय बोरस्ते, शिवसेना (शिंदे गट) उपनेते.

विभागनिहाय ग्राहक व शास्तीची रक्कम (कोटीत)

विभाग मालमत्ता धारक शास्ती रक्कम

पूर्व ५८,८९२ ६५.२३

नाशिकरोड ४९,१२८ ५०.११

पश्‍चिम २०,२४७ २५.३९

सिडको ८९,४९८ ३०.०४

पंचवटी ९५,५११ ८०.२७

सातपूर ५०,९५४ २१.५५

एकूण ३,६४,२३० २७२.५८

nmc
Nashik NMC News : अधिकाऱ्यांसमोर 4 हजार तक्रारींचे आव्हान! सुटीच्या दिवशीही काम करण्याच्या आयुक्तांच्या सूचना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.