Nashik ISKCON Temple : इस्कॉन मंदिरात 300 किलो द्राक्षांची सजावट

ISKCON Temple : इस्कॉनच्या श्री श्री राधा मदनगोपाल मंदिरात श्री नित्यानंद त्रयोदशी म्हणजेच श्री नित्यानंदप्रभूचा जन्मदिवस भाविकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.
An attractive grape decoration on the occasion of Nityananda Trayodashi festival at the ISKCON temple.
An attractive grape decoration on the occasion of Nityananda Trayodashi festival at the ISKCON temple.esakal
Updated on

Nashik ISKCON Temple : द्वारका येथील इस्कॉनच्या श्री श्री राधा मदनगोपाल मंदिरात श्री नित्यानंद त्रयोदशी म्हणजेच श्री नित्यानंदप्रभूचा जन्मदिवस भाविकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. मुंबईचे श्रीमान दामोदर प्रभू यांची सोहळ्यासाठी प्रमुख उपस्‍थिती लाभली. यानिमित्त तीनशे किलो द्राक्षांनी केलेली सजावट भाविकांचे लक्ष वेधत होती. भाविकांना उपदेश देताना दामोदर प्रभू म्‍हणाले, की श्रीकृष्णाची कृपा प्राप्त करणे अतिशय कठीण आहे. (Nashik Decoration of grapes in ISKCON temple marathi news)

परंतु नित्यानंदप्रभूची कृपा एखाद्या व्यक्तीवर झाली, तर त्या व्यक्तीला श्रीकृष्णाची कृपा प्राप्त करणे सुलभ होते. नित्यानंद प्रभूंची कृपा अनंत, अद्भुत तसेच अचिंत्य आहे. त्यांच्या कृपेसाठी प्रार्थना करायला हवी. महोत्सवानिमित्त मंदिराची तसेच श्री राधा-कृष्णाच्या विग्रहांची सजावट केली होती. हा द्राक्षांचा ऋतू असल्यामुळे सजावटीसाठी हिरवे तसेच काळे असे मिळून तीनशे किलो द्राक्षे वापरण्यात आले होते.

An attractive grape decoration on the occasion of Nityananda Trayodashi festival at the ISKCON temple.
Nashik ISKCON Temple : भगवान श्रीकृष्णाला 1008 पदार्थांचा नैवेद्य; 25 हजार भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

महोत्सवाला पहाटे पाचला मंगल आरतीपासून सुरवात झाली. त्यानंतर हरे कृष्ण महामंत्र जाप, दर्शन आरती व दामोदर प्रभूंचे श्रीमद्भागवत प्रवचन झाले. सायंकाळी विग्रहांचा पंचामृताने अभिषेक करण्यात आला. व १०८ पदार्थांचा नैवेद्य भगवंतांना अर्पण केले. यानंतर झालेल्‍या महाआरतीसाठी भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.

कार्यक्रमानंतर सुमारे दोन हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी गोपालानंद प्रभू, राजा रणछोडराय प्रभू, सार्वभौमकृष्ण प्रभू, भगवान नरसिंह प्रभू, सुमेध पवार, अक्षय एडके, कृष्णा गुजराती, यश भडके, सत्यभामा कुमारी माताजी, प्रेम शिरोमणी माताजी, पूर्ण शक्ती माताजी आदींनी परिश्रम घेतले. (latest marathi news)

An attractive grape decoration on the occasion of Nityananda Trayodashi festival at the ISKCON temple.
Nashik Kalaram Temple : काळाराम मंदिरात भाविकांनी अनुभवला किरणोत्सव; गाभाऱ्यातील मूर्तींना सूर्यस्नान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.