Bhagar
Bhagar esakla

Ashadhi Ekadashi 2024 : ऐन आषाढी एकादशीला भगरीच्या मागणीत घट; व्यापाऱ्यांकडून आयत्या वेळी खरेदी

Nashik News : आषाढी एकादशीला उपवासाच्या पदार्थांपैकी सर्वाधिक मागणी असणाऱ्या भगरीच्या मागणीत घट झाल्याची माहिती भगर मिल असोसिएशनचे अध्यक्ष महेंद्र छोरिया यांनी दिली.
Published on

नाशिक : आषाढी एकादशीला उपवासाच्या पदार्थांपैकी सर्वाधिक मागणी असणाऱ्या भगरीच्या मागणीत घट झाल्याची माहिती भगर मिल असोसिएशनचे अध्यक्ष महेंद्र छोरिया यांनी दिली. सर्वत्र पावसाचे पाहिजे तसे प्रमाण नसल्याने भगरीच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. शहरात गेल्या ७५ वर्षांपासून भगर इंडस्ट्री आहे. (Decrease in Bhagar demand on Ashadhi Ekadashi)

शहरात ३५ ते ४० भगर मिल्स असून प्रत्येक मिलमधून वर्षाला साधारण १५०० टन भगरीचे उत्पन्न होते, परंतु आषाढी एकादशी असूनही भगरीच्या मागणीत वाढ होण्याऐवजी घट झाली आहे. पेठ, हरसुल, सुरगाणा, जव्हार, त्र्यंबकेश्वर, मोखाडा, पेण, पनवेल या भागातून चांगल्या दर्जाचे भगरीचे उत्पन्न होते. मिलमध्ये येणारा १५ टक्के कच्चा माल महाराष्ट्रातून ८५ टक्के मध्य प्रदेश.

छत्तीसगड, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, गुजरात राज्यातून येतो. त्यापैकी ओरिसातून ३५ टक्के भगर नाशिकमध्ये येते. संपूर्ण भारताला नाशिकमधून जवळपास ९५ टक्के भगर निर्यात केली जाते. तृणधान्यातील महत्त्वाचे तृणधान्य भगरीसाठी लागणारा कच्चा माल वेगवेगळा आहे.

वरई, गोद्रा, उद्गी, सावा, राळा हे तृणधान्यातील प्रकार आहेत. या सगळ्यांपासून भगर बनते. वरईची भगर, राळ्याची भगर, साव्याची भगर या सर्व भगरी एकट्या नाशिक जिल्हयात बनतात. हंगामानुसार भारतात शहरातून भगर निर्यात केली जाते. महाशिवरात्री, नवरात्र याकाळात भगरीला सर्वाधिक मागणी असते. (latest marathi news)

Bhagar
Nashik News : पदस्थापना नसल्याने शिक्षकांचे रखडले वेतन!

प्रक्रियेची नैसर्गिक पध्दत

ज्वारी, बाजरी, नाचणी हे तृणधान्य लगेच खाता येते पण भगरीवर जोपर्यंत प्रक्रिया होत नाही तोपर्यंत ती खाण्यायोग्य बनत नाही. कच्च्या मालाच्या स्वरूपात भगर मिलमध्ये आल्यावर त्यात काडी, कचरा, माती असते. त्यानंतर मिलमध्ये अत्याधुनिक यंत्रणेने भगर स्वच्छ केली जाते. त्यावरील टरफल काढून ती खाण्यायोग्य बनते. त्यासाठी कोणतेही पाणी किंवा फवारणी केली जात नाही.

"पूर्वी भगरीला मागणी एवढी असायची की माल तयार नसायचा तरी मागणी प्रचंड असायची. आज माल तयार आहे पण व्यापारी खरेदी करायला तयार नाही. हे रोजच्या व्यवहारातून लक्षात येते. शिवाय सर्व ठिकाणी पावसाचे पाहिजे तसे प्रमाण नसल्याने व्यापारी आता वेळेवर ‘इन्स्टंट’ माल खरेदी करतात पूर्वीसारखा आता मालाचा साठा केला जात नाही. किराणा दुकानांमध्ये मंदी असून बाजारात मालाला उठावच नसल्याने व्यवहाराचे चक्र फिरत नाही."- महेंद्र छोरिया, अध्यक्ष, भगर मिल असोसिएशन

Bhagar
Nashik News : आयुक्तालयातील प्रभारींवर ‘खांदेपालटा’ची टांगती तलवार; सहायक आयुक्तांमध्ये फेरबदलाची चर्चा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.