Nashik Electricity Supply : पावसामुळे विजेच्या मागणीत घट! ‘महानिर्मिती’ची निर्मितीही सुस्तावली

Nashik News : विजेची मागणी कमी झालेली असताना महानिर्मितीची वीजनिर्मितीही निम्म्याहून कमी क्षमतेने सुरू होती. याउलट खासगी वीजनिर्मिती मात्र जोमात सुरू असल्याचे चित्र होते.
MAHAGENCO News
MAHAGENCO Newsesakal
Updated on

Nashik Electricity Supply : राज्यात सर्वदूर पावसाने दमदार हजेरी लावल्याने विजेच्या मागणीत मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे. उन्हाळ्यात २९ हजारांवर गेलेली विजेची मागणी रविवारी (ता. २५) दुपारी चारला १७ हजार ३५८ मेगावॉटवर आली होती. विजेची मागणी कमी झालेली असताना महानिर्मितीची वीजनिर्मितीही निम्म्याहून कमी क्षमतेने सुरू होती. याउलट खासगी वीजनिर्मिती मात्र जोमात सुरू असल्याचे चित्र होते. (production of Mahanirmitri slowed down)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.