Nashik Infant Mortality Rate : मातेच्या उदरात होणारे अल्प पोषण व जन्मतःच असणाऱ्या आजारांमुळे बालमृत्यूत होणारी वाढ रोखण्यास जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला काही अंशी यश मिळाले आहे. गतवर्षी जानेवारी ते जुलै या सात महिन्यात सुमारे १५९ बालकांचा मृत्यू झाला होता. यंदा मात्र हे प्रमाण १५१ वरच थांबले आहे. यात विशेष म्हणजे सुरगाणा, पेठ, त्र्यंबकेश्वर, कळवण, नाशिक या आदिवासी तालुक्यांमध्ये बालमृत्यूचे प्रमाण कमी झाले दिसत आहे. (Decrease in infant mortality compared to last year)