Nashik Citylinc Bus : मनस्तापामुळे सिटीलिंकच्या प्रवाशांत घट; वारंवारच्या संपाचा परिणाम

Citylinc Bus : संप मागे घेतल्यानंतर दहाव्या दिवशी सुरळीत झाले असले तरी अनियमिततेमुळे प्रवाशांनी सिटीलिंकच्या सेवेऐवजी खासगी वाहनाने प्रवास करण्याला प्राधान्य दिले.
Citylinc Bus Strike
Citylinc Bus Strikeesakal
Updated on

Nashik Citylinc Bus : दोन वर्षांत नऊ वेळा संपाला सामोरे गेलेल्या सिटीलिंक कंपनीचे कामकाज वाहकांनी संप मागे घेतल्यानंतर दहाव्या दिवशी सुरळीत झाले असले तरी अनियमिततेमुळे प्रवाशांनी सिटीलिंकच्या सेवेऐवजी खासगी वाहनाने प्रवास करण्याला प्राधान्य दिले. तर नऊ दिवसांत महापालिकेला कारण नसताना ऑपरेटर कंपन्यांना ८० लाखांहून अधिक रक्कम मोजावी लागणार आहे. (nashik Decreasing in passengers of citylinc marathi news)

शिवाय प्रवाशांच्या मनस्तापाने सिटीलिंक सेवेवरचा विश्‍वासही डळमळीत झाला आहे. सन २०२१ मध्ये महापालिकेच्या सिटीलिंक कंपनीकडून शहर बससेवा सुरु झाली. सद्यस्थितीत अडीचशे बस चालविल्या जातात. यातील २१० बससाठी वाहक व चालक पुरविण्याची जबाबदारी दिल्लीस्थित मॅक्स डिटेक्टिव्ह कंपनीकडे तर ४० बससाठी चालक व वाहक पुरविण्याची जबाबदारी युनिटी सर्विसेस या कंपनीकडे आहे.

तपोवनातून २१० तर नाशिकरोड डेपोतून ४० बस चालविल्या जातात. दोन वर्षांत वाहक व चालकांनी वेतन व भविष्य निर्वाह निधी मक्तेदारांकडून जमा होत नसल्याने तब्बल नऊ वेळा संप पुकारला. १ सप्टेंबर २०२२, ६ डिसेंबर २०२२, ६ एप्रिल २०२३, ११ मे २०२३, १८ व १९ जुलै २०२३, ४ ऑगस्ट २०२३, २२ नोव्हेंबर २०२३ तसेच फेब्रुवारी २०२४ व १४ मार्च २०२४ पासून असा नऊ वेळा संप झाला. सर्वाधिक नऊ दिवस चाललेला संप शुक्रवारी (ता.२१) वाहकांकडून मागे घेण्यात आला.

चुकीच्या पद्धतीने करार

महापालिकेने चुकीच्या पद्धतीने ऑपरेटर कंपन्यांशी करार केले आहेत. बस धावल्या नाही तरी महापालिकेला बसचे किलोमीटर प्रमाणे पैसे द्यावे लागणार असल्याचे करारात नमूद केले आहे. संपामुळे बस बंद असल्या तरी वीस टक्के पैसे द्यावे लागणार आहेत. ८५ रुपये किलोमीटर प्रमाणे दररोज पैसे अदा केले जातात. त्यासाठी दोनशे किलोमीटर बस धावण्याची अट आहे.  (latest marathi news)

Citylinc Bus Strike
Nashik Citylinc Bus : सिटीलिंक बससेवा आजपासून सुरळीत; वाहकांच्या संपावर अखेर तोडगा

शहरात दोन बस ऑपरेटर आहेत. संपात बंद असलेल्या २१० बसचे प्रत्येकी चार हजार रुपयांप्रमाणे साडे आठ लाख रुपये दररोज अदा करावे लागणार आहेत. डेपोत बस उभ्या असल्याने नऊ दिवसांत ८० लाखांवर रक्कम ऑपरेटर कंपन्यांना द्यावी लागणार आहे. सिटीलिंक कंपनीला व पर्यायाने नाशिक महापालिकेला कारण नसताना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे.

पास धारकांना सवलत

नऊ दिवस ठप्प असलेली सेवा पूर्ववत झाली असली तरी अनियमिततेमुळे बससेवेला प्रवाशांचा प्रतिसाद मिळालेला नाही. संपामुळे पास धारकांचे नुकसान झाले ते नुकसान भरून काढण्यासाठी पासधारकांना नऊ दिवसांची मुदतवाढ दिली जाणार असल्याची माहिती सिटीलिंकचे व्यवस्थापक (संचलन) मिलिंद बंड यांनी दिली.

२५४० बसफेऱ्या

संप मागे घेतल्यानंतर नाशिकरोड डेपोतून ९८ बस पूर्ववत झाल्या. तपोवन डेपोतून १४८ बस सुरू झाल्या. या २४६ बसच्या माध्यमातून शनिवारी २५४० बसफेऱ्या पूर्ववत सुरू झाल्याचे सिटीलिंक प्रशासनाने सांगितले. बस फेऱ्या पूर्ववत झाल्या असल्या तरी प्रवाशांनी सेवेकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले.

Citylinc Bus Strike
Nashik Citylinc Bus Strike : वेतन अदा करूनही कर्मचारी संप कायम; सिटीलिंक प्रशासन मेटाकुटीला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.