Nashik News : पाण्याच्या स्रोतांचे वेळेत शुद्धीकरण करा : दीपक पाटील

Nashik : जिल्ह्यातील बऱ्याच ठिकाणी पाऊस सुरू झाल्याने नदी, नाले यांचा पाण्याचा प्रवाह वाढू लागला आहे.
Check drinking water sources before monsoon
Check drinking water sources before monsoonesakal
Updated on

Nashik News : जिल्ह्यातील बऱ्याच ठिकाणी पाऊस सुरू झाल्याने नदी, नाले यांचा पाण्याचा प्रवाह वाढू लागला आहे. यामुळे या लगतच्या पिण्याच्या पाण्याच्या सार्वजनिक विहिरी व हातपंपाचे पाणी दूषित होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने गावांतील पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचा परिसर नियमित स्वच्छ ठेवणे, सर्व सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे वेळेत शुद्धीकरण करण्यात यावे व पाणी अशुद्ध होऊ नये, याची काळजी घ्यावी, अशा सूचना जिल्हा परिषदेचे पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक पाटील यांनी दिले आहेत. (Deepak Patil statement of Purify water sources in time )

उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाटील यांनी सर्व गटविकास अधिकाऱ्यांना पत्र देत शुद्ध पाणीपुरवठा करण्याबाबतचे निर्देश दिले आहेत. ग्रामपंचायत स्तरावर पाण्याच्या टाकीचे शुद्धीकरण केल्यावर जागेवरच ओटी टेस्ट घेणे, स्रोताचे पाणी वापरण्यापूर्वी त्याची जैविक व रासायनिक तपासणी नियमित करावी, ब्लिचिंग पावडरचा नमुना जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेतून तपासून घेणे व त्याचा अहवाल प्राप्त करून घेणे बंधनकारक आहे. (latest marathi news)

Check drinking water sources before monsoon
Nashik News : अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांच्या जिल्ह्यात धान्य वितरण ठप्प; फोर जी पॉस मशीन्सला सर्वर डाऊनचा फटका

स्रोताचे पाणी हे प्रशिक्षित जलसुरक्षक किंवा आरोग्यसेवक यांनी तपासावे आणि त्यांची दैनंदिन अहवालात त्यांच्या स्वाक्षरीसह नोंद करावी, पिण्यास सतत अयोग्य असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांसमोर पिण्याचे पाणी भरू नये, याबाबत कार्यक्षेत्रात दवंडी देऊन याबाबत जनजागृती करावी, स्रोत प्रतिबंधित असल्याचा फलक लावावा, तालुक्याच्या कार्यक्षेत्रातील सर्व गावांतील स्रोतांच्या आजूबाजूच्या परिसरात स्वच्छता करून सर्व स्रोतांचे (हातपंप/ सार्वजनिक विहीर/पाण्याची टाकी) तत्काळ मोहीम स्वरूपात शुद्धीकरण करून घ्यावे.

वाडी-वस्तीवर नळाद्वारे पाणीपुरवठा करणे शक्य नसेल अशा ठिकाणी नागरिकांना मेडीक्लोर द्रावणाच्या बाटलीचे घरोघरी वाटप करण्याचे नियोजन करावे, गावात खासगी आरओ प्लांटधारक पाणीपुरवठाधारकांकडून खासगी वाहनाने पाण्याच्या जारद्वारे पाणीपुरवठा होतो. त्यामुळे संबंधित प्लांटधारकाचे गावात येणाऱ्या जारमधील पाण्याची अणुजैविक तपासणीसाठी आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत नमुने तपासणी महिन्यातून एकदा करून घेणे आवश्यक असल्याच्या सूचना पाटील यांनी पत्राद्वारे दिल्या आहेत.

Check drinking water sources before monsoon
Nashik News : मालेगावला आजपासून 3 दिवसांआड पाणी; धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस जेमतेमच

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.