Dada Bhuse : साथीच्या आजाराने राज्य सरकारची बदनामी; पालकमंत्री भुसे यांच्याकडून वैद्यकीय विभागाची झाडाझडती

Dada Bhuse : शहरात डेंगी रुग्ण संख्येत सातत्याने वाढ होत असताना साथीच्या इतर आजारांचादेखील फैलाव मोठ्या प्रमाणात होत आहे.
Dada Bhuse
Dada Bhuse esakal
Updated on

Dada Bhuse : शहरात डेंगी रुग्ण संख्येत सातत्याने वाढ होत असताना साथीच्या इतर आजारांचादेखील फैलाव मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे राज्य सरकारची मोठी बदनामी होत असल्याच्या कानपिचक्या देत पालकमंत्री दादा भुसे यांनी वैद्यकीय विभागाला तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. त्याचबरोबर आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्याशी संपर्क साधून जिल्हा रुग्णालयात डेंगी तपासणी किट उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्यानंतर तातडीने किट उपलब्ध झाल्या आहेत. ()

त्यामुळे येत्या दोन दिवसात प्रलंबित चाचण्यांची तपासणी होऊन डेंगीचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शहरांमध्ये डेंगी रुग्णांची सातत्याने वाढ होत आहे. वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य विभागाच्या पथकाने नाशिकमध्ये येऊन काही भागांना भेटी दिल्या त्यामध्ये डेंगी आळ्या सापडल्याची बाब समोर आली. त्यामुळे महापालिकेला अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या. वैद्यकीय विभागाकडून तातडीची बाब म्हणून घरोघरी जाऊन डेंगीची उत्पत्ती साधने शोधण्यासाठी पथकांची निर्मिती करण्यात आली.

जवळपास २०० पथकाच्या माध्यमातून शहरांमध्ये तपासणी सुरू आहे. या उपर ही डेंगी रुग्णांची सातत्याने वाढ होताना दिसत आहे. जुलै महिन्याच्या मागील दोन आठवड्यात तब्बल अडीचशे रुग्ण नव्याने आढळून आले. याची दखल पालकमंत्री दादा भुसे यांनी घेतली. संदर्भ रुग्णालयात महापालिका जिल्हा परिषद व जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय क्षेत्रातील अधिकाऱ्यांची तातडीने बैठक घेतली. या बैठकीमध्ये महापालिकेच्या वैद्यकीय विभागाची झाडाझडती घेण्यात आली. (latest marathi news)

Dada Bhuse
Dada Bhuse News : काळाराम मंदिरासाठी एक कोटी 82 लाख; जिल्हा नियोजनाची मान्यता

डेंगी निर्मूलनासाठी अधिकाऱ्यांनी रस्त्यावर उतरावे, जनजागृतीसाठी अतिरिक्त मनुष्यबळ नियुक्त करावे, ट्रॅक्टरच्या माध्यमातून धूर फवारणी करावी, अशा सूचना भुसे यांनी देताना साथीच्या आजारांमुळे राज्य सरकारची बदनामी थांबविण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या. वाढत्या डेंगीच्या पार्श्वभूमीवर वॉक फॉर डेंगी हा उपक्रम हाती घेण्याच्या सूचना दिल्या. यामध्ये शहरातील प्रत्येक घर, सोसायटी व शासकीय कार्यालयांमध्ये डेंगीबाबत जनजागृती केली जाणार आहे आठवडाभरापेक्षा अधिक काळ साठवून ठेवलेल्या पाणी फुलदाण्या, फ्रिज ट्रे, भंगार साहित्य, निकामी टायर आधी ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्याच्या सूचना दिल्या.

रुग्णांची संख्या वाढणार

जिल्हा रुग्णालयातील शासकीय प्रयोगशाळेत खासगी रुग्णालयाकडून डेंगी बाधित रुग्णांचे अहवाल फेरतपासणीसाठी पाठविले जातात. ते नमुने पॉझिटिव्ह आढळल्यानंतरच डेंगी रुग्ण ग्राह्य धरला जातो. जिल्हा रुग्णालयात डेंगी निदानासाठी आवश्यक असलेले डेंगी तपासणी किट संपले होते. त्यामुळे जवळपास २५० हून अधिक अहवाल प्रलंबित असल्याची बाब पालकमंत्री भुसे यांनी गांभीर्याने घेत आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर रुग्णालयातील लॅबमध्ये किट प्राप्त झाले. महापालिकेचे प्रलंबित अहवाल तपासणी झाल्यानंतर यातून डेंगी रुग्णांची संख्या वाढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

''पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार शहरात डेंगी नियंत्रणात आणण्यासाठी धूर फवारणीसह जनजागृतीमध्ये नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी ‘वॉक फॉर डेंगी’ उपक्रम हाती घेतला जाणार आहे.''- डॉ. तानाजी चव्हाण, वैद्यकीय अधीक्षक, महापालिका

Dada Bhuse
Nashik Dada Bhuse : जिल्हा बॅंक सक्तीच्या वसुलीविरोधात लवकरच बैठक : भुसे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.