नाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ऑक्टोबर सत्र परीक्षेच्या ऑनलाइन अर्ज प्रक्रियेत गोंधळ समोर आला आहे. अर्ज भरण्याच्या लिंकमध्ये पदव्युत्तरच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमाऐवजी पदवी स्तरावरील विषय दाखविले जात आहेत. अंतिम मुदत गुरुवारी (ता. २४) असताना उद्भवलेल्या या घोळाबाबत विद्यापीठाकडे विचारणा केली असता, विभागांकडून टोलवाटोलवी केली जात असल्याचा अनुभव शहरातील महाविद्यालयांना आला. (Problem in SPPU website while filling exam form)