Nashik News : पाऊस लबाड, ढगांच्या आड दडतोय..! येवल्यात पेरणीचा जुगार

Nashik : यंदा पावसाळा सुरु होताच या कवितेची आठवण वरुणराजाने शेतकऱ्यांना करायला लावली आहे.
Monsoon Delay
Monsoon Delayesakal
Updated on

Nashik News : ‘पाऊस लबाड... ढगांच्या आड दडतो.., पाऊस अवेळी कोपर खळी काढतो..!’ यंदा पावसाळा सुरु होताच या कवितेची आठवण वरुणराजाने शेतकऱ्यांना करायला लावली आहे. पहिल्या टप्य्यात हजेरी लावलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरणी केली खरी; परंतु निमित्तमात्र झालेल्या या पावसाने पेरणीचा खेळ केला आहे. सर्वत्र खरीपाची पेरणी ४५ टक्क्यांवर झाली आहे. मात्र, जमिनीतून पिकांचे कोंब उगवत असतांनाच पाऊस गायब झाला असून उगवणारे कोंब ढेकळातच गुदमरत आहेत. ( delay of sowing in Yeola due to rain )

तालुक्यात पेरणी खोळंबली असून, आता ऊन पडल्याने ‘टेन्शन’ वाढले आहे. मृग बरसला की खरिपाच्या पेरणीचा विषय मार्गी लागतो. यंदा अद्यापही धोधो पाऊस बरसलेला नसून सुरुवातीला झालेल्या दोन-तीन पावसाच्या जोरावर शेतकऱ्यांनी पेरणीचा जुगार खेळला आहे. समाधानकारक पाऊस नसल्याने शेतकरी हवालदिल असला तरी पेरणी पूर्ण होऊन मका, सोयाबीन, कपाशीचे कोंब उगवत तास धरू लागले आहे.

अल्प पावसावर पेरणी करणे जुगार असल्याचे माहित असूनही हंगाम पुढे लोटू नये म्हणून पेरणीसाठी अनुकूल स्थिती नसतांना देखील पेरण्यांनी वेग घेतला आहे. पेरणीचा अंदाज घेतल्यास शेतकरी कापूस व मका या पिकाकडे अधिक वळाले आहे. तालुक्यात गतवर्षीच्या तुलनेत यंदा मका, सोयाबिनचे क्षेत्र वाढले आहे.

सध्याच्या भावाचा विचार करता लाल कांदा लागवड वाढणार असून, त्यासाठी मुगाची पेरणी केली आहे. पश्‍चिम भागात पेरणीयोग्य पाऊस पडल्याने पेरणी बिनधास्तपणे उरकण्यात आली आहे. पण, काही शेतकऱ्यांनी पाउस पडता झाला असून, आता अजून पडेल या आशावादावर जुगार खेळत पेरणी केली आहे. पण, उन पडल्याने आता सगळेच टेन्शनमध्ये आले आहेत.(latest marathi news)

Monsoon Delay
Nashik News : डंपरमधून पडणारी वाळू, खडी बेतते जीवावर!

यंदा पावसाचे रोहिणी पाठोपाठ हक्काचे मृग नक्षत्रदेखील घात करणारे ठरत असून, जूनचा तिसरा आठवडा सुरु झाला. पण, अद्याप जोरदार पावसाचे आगमन झालेले नाही. बंधारे, विहिरी, कुपनलिका कोरड्याठाक आहे. अद्यापही १०० हून अधिक ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा सुरूच आहे. सर्वत्र पेरणी ‘तास’धरून उगवली आहे. वाढीस लागलेल्या पिकांना पाण्याची गरज भासू लागल्याने जोरदार पावसाची आस लागली आहे.

कपाशीत अनपेक्षित घट!

तालुक्यात आतापर्यंत मुगाच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. तसेच मका, सोयाबीनचे क्षेत्र टिकून असल्याचे दिसते. याउलट मागील दशकभर शेतकऱ्यांना हक्काची वाटणाऱ्या कपाशीच्या लागवडीत विक्रमी घट झाली आहे. कपाशीची अवघी ५ टक्के पेरणी झाल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. पुढील आठवड्यापर्यंत पेरणीचा आकडा ओलांडला जाणार असल्याचे कृषी विभागातून सांगण्यात आले.

अशी झाली पेरणी

पिक - सरासरी क्षेत्र - पेरणी क्षेत्र - टक्के

ज्वारी - ४ - ०० - ०

बाजरी - ९७३० - ३८१० - ३९

मका - ३५११९ - ३१६५७ - ९१

तूर - ११२८ - १८४ - १७

मूग - ५२४० - ९६०१ - १८३

उडीद - ५२५ - १२ - ३

भुईमुग - २६१४ - ९०० - ३५

सोयाबीन - ४७१२ - ६२७५ - १३३

कापूस - ११०३९ - ४९६ - ५

एकूण - ७०१११ - ५२९३५ - ७५.४८

Monsoon Delay
Nashik News : मिरची पिकावर घुबड्या रोगाचा प्रादुर्भाव; निफाडच्या पूर्वपट्यात औषध फवारूनही उपयोग होईना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.