Nashik News : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेली अक्षयतृतीया शुक्रवार (ता. १०) साजरी झाली. यात्यानिमित्त पेठ रोडवरील शरदचंद्रजी मार्केट यार्डात फळ खरेदीसाठी दर वर्षी गर्दी होत असते. मात्र, या वर्षी अक्षयतृतीयेला आंबा खरेदीसाठी गर्दी न होता गुरुवारी व बुधवारी गर्दी झाली होती. अक्षयतृतीयेला घराघरांत होणाऱ्या पितरांच्या पूजेसाठी लागणाऱ्या पूजेच्या साहित्यात आंब्याला अनन्यसाधारण महत्त्व असते. (Demand for mangoes on occasion of Akshaya Tritiya)
आमरसाचा नैवेद्यही आवर्जून दाखविला जातो. त्यामुळे या सणाच्या कालावधीत आंब्यांना चांगली मागणी असते. आंबे खरेदीसाठी बाजार समितीच्या फळ बाजारात दर वर्षी मोठी गर्दी होत असते. बुधवारी (ता. ८) व गुरुवारी (ता. ९) ग्राहकांनी आंबा खरेदीसाठी गर्दी केली होती. या वेळी शरदचंद्रजी मार्केट यार्ड फळ विभागात जुनागड केशर.
रत्नागिरी हापूस, देवगड हापूस, बँगलोर लालबाग, विजयवाडा बदाम, आम्रपाली गुजरात, हैदराबाद मलिका, रत्नागिरी पायरी, रत्नागिरी केशर या प्रजातींचे आंबे उपलब्ध होती. यात सर्वाधिक हापूस व केशर आंब्यांची विक्री झाला. केशर आंब्याला सर्वसाधारण १२० ते १८० प्रतिकिलो रुपये दर मिळाले, अशी माहिती फळ व्यापारी भारत मोटवानी यांनी दिली. (latest marathi news)
आंबा महोत्सवाला चांगला प्रतिसाद
नाशिककरांसाठी शरदचंद्रजी पवार मार्केट यार्डात प्रथमच फळ विभागातील एम. आर. फ्रूट कंपनी, चामुंडा फ्रूट कंपनी व गवळी ब्रदर्स यांनी संयुक्त विद्यमाने तीनदिवसीय आंबा महोत्सवाचे आयोजन केले होतो. आंबा महोत्सवाला ग्राहकांचा प्रतिसाद चांगला मिळाला.
यात रत्नागिरी केशर, हापूस व हैदराबादचा मालिका आंब्यांना जास्त मागणी होती, अशी माहिती आंबा महोत्सवाचे आयोजन करणारे व्यापारी विशाल गवळी यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.