Nashik Drought News : निवडणुका संपल्या! पाणी आणि चाराटंचाईकडे लक्ष द्या; जिल्ह्यातील 1220 गावे-पाडे टॅंकरग्रस्त

Nashik News : जिल्ह्यातील मतदान आटोपले. त्यामुळे आता प्रशासन अन शासनाने दुष्काळाकडे गांभीर्याने पाहावे, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.
drought
drought esakal
Updated on

Nashik News : लोकसभा निवडणुकीची कामे आणि प्रचार करण्यात राज्याचे प्रशासन-लोकप्रतिनिधी व्यस्त असतानाच जिल्ह्यात सर्वत्र उन्हाची आणि पाणीटंचाईची धग बसू लागली आहे. ग्रामीण भागात जलस्रोत आटल्याने, तसेच धरणांमधील पाण्याने तळ गाठला असल्याने भीषण पाणीटंचाईचे संकट उभे राहिले. (administration and government should look at drought seriously)

जिल्ह्यातील तब्बल एक हजार २२० गावे-पाड्यांना ३७० टॅंकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा करावा लागत आहे. दुसरीकडे, चाराटंचाईची भीषणताही वाढत चालली. जिल्ह्यात जूनअखेरपर्यंत पुरेल इतकाच चारा शिल्लक आहे. जिल्ह्यातील मतदान आटोपले. त्यामुळे आता प्रशासन अन शासनाने दुष्काळाकडे गांभीर्याने पाहावे, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.

एकीकडे वळिवाचा पाऊस धुमाकूळ घालत आहे. अद्यापही मॉन्सून सुरू होण्यासाठी काही कालावधी असताना जिल्ह्याला भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. जिल्ह्यातील धरणांमध्ये जेमतेम २० टक्क्यांपेक्षा कमी साठा शिल्लक आहे. यातच जिल्ह्याचे तापमान ४२ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याने उन्हाच्या झळा वाढताना दिसतात.

परिणामी, स्थानिक जलस्रोत कमी पडू लागल्याने ग्रामीण भागांत टँकरची मागणी दिवसेंदिवस वाढते. पुरेसा पाऊस नसल्याने गेल्या वर्षापासून जिल्ह्यातील काही गावांना टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. सद्यस्थितीत ३४८ गावे अन ८७२ वाड्या अशा एकूण एक हजार २२० गाव-वाड्यांना ३७० टॅंकरच्या ८१४ फेऱ्यांद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. (latest marathi news)

drought
Nashik MSEDCL Tree Cutting : झाडांची छाटणी की कत्तल? वीजवितरण कंपनीवर कारवाईची मागणी

यात १४ शासकीय आणि ३५६ खासगी टॅंकरचा समावेश आहे. टॅंकर भरण्यासाठी आतापर्यंत तब्बल २०१ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले. यात गावांसाठी ६१, तर टॅंकरसाठी १३४ विहिरींचा समावेश आहे. त्यामुळे पुढील दीड महिना शेतकऱ्यांसाठी कसोटीचा ठरेल. त्यासाठी प्रशासन, शासन यांनी आता दुष्काळाकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होऊ लागली आहे.

झपाट्याने वाढत आहेत टॅंकर

तालुकानिहाय विचार करता सिन्नर, नांदगाव, मालेगाव तालुक्यांत झपाट्याने टॅंकर वाढताना दिसत आहेत. तसेच, पश्चिम पट्ट्यातील पेठ, सुरगाणा, इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यांतही टॅंकरची मागणी वाढत चालली असल्याचे पाहावयास मिळत आहे. बागलाण (४२), चांदवड (३३), देवळा (३३), इगतपुरी (७), मालेगाव (४९), नांदगाव (६९), नाशिक (१), पेठ (१६), सुरगाणा (१७), सिन्नर (४२), त्र्यंबकेश्वर (४), येवला (५७) येथे टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.

टॅंकर वाढण्याची भीती

प्रशासकीय यंत्रणेतील अधिकारी, कर्मचारी हे लोकसभा निवडणुकीच्या कामात व्यस्त होते. त्यामुळे टॅंकर मागणी प्रस्तावांकडे गत आठवडाभरात फारसे लक्ष दिले गेले नाही. मात्र, आता अधिकारी व कर्मचारी कामांतून मोकळे झाले आहेत. त्यामुळे पडून असलेल्या टॅंकर मागणीचे प्रस्ताव मार्गी लागतील. आगामी काळात टॅंकरची संख्या वाढण्याची भीती प्रशासनाकडूनच व्यक्त केली जात आहे.

drought
Nashik News : शासकीय अंधशाळेत प्रवेश प्रक्रिया सुरू

जिल्ह्यात ३.७० टन चारा

पाण्यापाठोपाठ जिल्ह्यात चाराटंचाईचे संकट उभे राहू शकते. जिल्ह्यात आठ लाख ६६ हजार २८४ मोठी जनावरे, दोन लाख २० हजार २६ लहाने जनावरे, आठ लाख ५२ हजार ९५५ शेळ्या-मेंढ्या अशी एकूण १९ लाख ४१ हजार २६५ जनावरे आहेत. त्यांना प्रतिमहिना एक लाख ८६ हजार १५० टन चारा लागतो. सद्यस्थितीत जिल्ह्यात तीन लाख ७० हजार टन चारा उपलब्ध आहे. हा चारा जूनअखेर पुरेल इतकाच आहे. सिन्नर, चांदवड, नांदगाव या भागांत चारा कमी आहे. त्यामुळे या तालुक्यांतून मागणी होऊ शकते.

"राज्यासह नाशिक जिल्हा दुष्काळाने होरपळत आहे. बहुतांश भाग भीषण टंचाईचा सामना करीत आहे. धरणांतील साठा जेमतेम असून, हजारो गावांना, वाड्या-वस्त्यांना पिण्याचे पाणी मिळत नाही. पाणीटंचाई असलेल्या प्रत्येक गाव-खेड्यात पिण्याचे पाणी मिळावे, तसेच जनावरांना चारा उपलब्ध झाला पाहिजे. लोकसभा निवडणुका संपल्या आहेत. आता राज्य सरकारने दुष्काळाकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. आचारसंहिता शिथिल करून तातडीने पिण्याचे पाणी व जनावरांना चारा मिळेल, यासाठी सरकारने निर्णय घ्यावा." - शिरीषकुमार कोतवाल, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस

drought
Nashik Police Election Duty : EVM च्या ‘स्ट्राँग रुम’ भोवती पोलिसांची फुट पेट्रोलिंग! दरतासाला सुरक्षेचा आढावा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.