Nashik Dengue Update : ‘अल निनो’ वादळ व जागतिक तापमान वाढीचा प्रभाव वाढत असल्याने देशभरात डेंगीचा प्रादुर्भाव वाढत आहे. डेंगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करणे हा उपाय असून त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी महत्त्वाची भूमिका बजावावी अशा सूचना केंद्र आरोग्य सचिवांच्या बैठकीत देण्यात आल्या. (Dengue outbreak due to El Nino)
डेंगीचा प्रादुर्भाव वाढत असल्याने केंद्रीय आरोग्य मंत्र्यांकडून व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बैठक घेण्यात आली. यात राज्यातील सर्व महापालिकांचे आयुक्त तसेच दिल्ली, गुजरात, कर्नाटक, तेलंगण, राजस्थान, उत्तर प्रदेश या नऊ राज्यांमधील अधिकारी उपस्थित होते. राज्यात नाशिक, मुंबई, ठाणे, नागपूर, पुणे या महापालिकांचे अधिकारी उपस्थित होते.
नाशिक शहरातील डेंगीचा आढावा या वेळी घेण्यात आला. जागतिक तापमान वाढ व ‘अल निनो’ मुळे डेंगीचा प्रादुर्भाव वाढत असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. डेंगीवर उपाय सुचविताना आठवड्यातून एक कोरडा दिवस पाळण्याच्या सूचना देण्यात आल्या, अशी माहिती महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. तानाजी चव्हाण यांनी दिली. (latest marathi news)
डेंगी किटसाठी शासनाकडे धाव
डेंगी रुग्णांची रक्तजल नमुन्यांची तपासणी जिल्हा रुग्णालयातील सेंटीनेट लॅबमध्ये होते. शहरात डेंगीची रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहे त्यामुळे चाचणीची संख्यादेखील वाढली आहे. चाचणीसाठी तुटवडा निर्माण झाल्याने महापालिकेने किटस उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य संचालकांना पत्र पाठवण्यात आले असून, कीट उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.