Nashik Dengue Patient: इंदिरानगरमध्ये डेंगी रुग्ण सापडल्याने तपासणी

Health workers inspecting the terrace of a building where a dengue patient was found.
Health workers inspecting the terrace of a building where a dengue patient was found.esakal
Updated on

Nashik Dengue Patient : प्रभाग ३० मधील कलानगर भागातील बाप- लेकाला डेंगीची लागण झाल्यामुळे माजी नगरसेविका सुप्रिया खोडे यांच्या पुढाकाराने मनपाच्या आरोग्य विभागाच्या पथकामार्फत या संपूर्ण इमारतीसह शेजारच्या दोन इमारतींचीदेखील तपासणी करण्यात आली. (Nashik Dengue patient found in Indiranagar investigated)

वैद्यकीय अधिकारी डॉ. पाटील यांच्याशी संपर्क साधून बारा जणांची संपूर्ण टीम येथे बोलावण्यात आली. सर्वांनी प्रत्येक सदनिकेत असणाऱ्या झाडाच्या कुंड्या, पार्किंगमधील व्यवस्था, तसेच टेरेसवर पडलेला कचरा, वाहनांचे जुने टायर, नारळाच्या करवंट्या आदि साहित्य पडलेले बघून आश्चर्य व्यक्त केले.

या ठिकाणी असलेल्या पाण्याच्या टाकीची तपासणी करण्यात आली. प्रत्येक सदनिकेत जाऊन पाणी साठवण्यासाठी ठेवलेल्या भांड्यांची तपासणी करण्यात आली. एकंदर परिस्थिती बघून सोसायटीचे अध्यक्ष श्रीवास्तव यांना आरोग्य विभागातर्फे नोटीस बजावण्यात आली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Health workers inspecting the terrace of a building where a dengue patient was found.
NMC Pest Control Work: पेस्ट कंट्रोलचे काम वादग्रस्त ठेकेदाराकडे; डेंगीचा प्रकोप वाढत असल्याचे निमित्त

येथील रहिवाशांना आरोग्य कर्मचाऱ्यांनी आवश्यक त्या सूचना दिल्या. शेजारी असलेल्या दोन इमारतींमध्येदेखील तपासणी करण्यात आली. दरम्यान ही तपासणी मोहीम यापुढे देखील सुरू ठेवण्यात येईल असे आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केले.

"लाऊड स्पीकरच्या माध्यमातून डेंगीबाबत जनजागृती आणि नागरिकांनी काय काळजी घ्यावी याबाबत मार्गदर्शन केले पाहिजे. नागरिकांनीदेखील घरात पाणी साठणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. संपूर्ण प्रभागात गरज असेल तेथे धूर तपासणी करावी अशी मागणी केली आहे."

- सुप्रिया खोडे, माजी नगरसेविका

Health workers inspecting the terrace of a building where a dengue patient was found.
Engineering Admission : अभियांत्रिकीच्‍या कॅप राउंड 20 जुलैपासून सुरु

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.