Nashik Dengue Update: जिल्ह्यात डेंगीचे 20 रुग्ण

dengue
dengueesakal
Updated on

Nashik Dengue Update : वातावरणातील बदलामुळे साथरोगांचे रुग्ण वाढत असून जिल्ह्यात सद्यस्थितीला डेंगीचे २० रुग्ण आहेत. या तुलनेत चिकनगुनिया नियंत्रणात असल्याने आरोग्य विभागावरील कामाचा ताण कमी झाल्याचे दिसून येते.

शहरासह ग्रामीण भागात डोळे येण्याची साथ, डेंगीचे रुग्ण वाढले आहेत. (Nashik Dengue Update 20 cases in district news)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

dengue
Nashik News: व्यापार, उद्योग संघटनांच्या साहाय्याने शहराचा विकास : आयुक्त डॉ. करंजकर यांचे आश्वासन

जिल्हा परिषद आरोग्य विभागाने एप्रिल २०२३ पासून ५३४ व्यक्तींचे नमुने तपासले आहेत. त्यापैकी ३८ व्यक्तींना डेंगी आढळला. त्यातील २० रुग्ण हे जुलै महिन्यातील आहेत. एका विशिष्ट भागातील हे रुग्ण नसल्यामुळे साथरोग पसरली असे म्हणता येणार नाही. स्वच्छ पाण्याच्या ठिकाणी डेंगीचे डास वाढतात.

पावसाळ्यात त्याचा प्रादुर्भाव वाढत असल्याने रुग्णही वाढत आहेत. चिकनगुनियाचे एप्रिलपासून ५८१ व्यक्तींचे नमुने तपासले असून त्यापैकी दोन व्यक्तींना लागण झाल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे.

dengue
Nashik News: संदर्भसेवा रुग्णालयातील ‘कॅथलॅब’ दुरुस्तीला 10 लाख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.