Nashik Dengue Update : 150 ठिकाणी आढळल्या डास अळ्या; आरोग्य विभागाचे सर्व्हेक्षण

Dengue Update : पिंपळगावात सर्व्हेक्षणात १५० हून अधिक ठिकाणी डास अळ्या आढळले.
Health workers emptying water containers found with mosquito larvae
Health workers emptying water containers found with mosquito larvaeesakal
Updated on

Nashik Dengue Update : जिल्ह्यात डेंग्यू डासांच्या अळ्या व तापाचे रूग्ण वाढत असतांना पिंपळगाव बसवंतला मात्र घराघरांत पाणी साठवणुकीची भांडी,तसेच परिसरात फुटके डबे,खराब टायर,फुलांच्या कुंड्या,टेरेसवर ठेवलेल्या साहीत्यातील पाणी रिकामे केले जात नसल्याचे सर्वेक्षणात पुढे आले आहे. पिंपळगावात सर्व्हेक्षणात १५० हून अधिक ठिकाणी डास अळ्या आढळले. त्यामुळे पिंपळगावचे ग्रामस्थ पाणी साठविण्याची भांडी स्वच्छ ठेवण्यात उदासीन असल्याचे पुढे येत आहे. ( Mosquito larvae found in 150 places in survey of health department)

शहरात डेंगीचा रूग्ण नसला तरी शिरसगांव,साकोरे येथे रूग्ण आढळले आहेत. आतापर्यत ३ हजार घराचे सर्व्हेक्षण झाले. त्यात तापाचे रूग्ण आढळल्यास रक्तांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात येत आहेत.तापाचे रूग्ण व डास अळ्या आढळलेली भांडी भविष्यात धोक्याची घंटा ठरू शकते. सर्व्हेक्षणात घरांच्या अडगळीतील साहित्यात, कुंड्याखाली ठेवलेल्या प्लेटमध्ये, फ्रिज मागील ट्रे मध्येपाणी काढून कोरडे केले जात नसल्याने डास,अळ्या तयार होऊन डासांची निर्मीतीला हातभार लागत असल्याचे आरोग्य विभागाचे मत आहे. (latest marathi news)

Health workers emptying water containers found with mosquito larvae
Nashik Dengue Update: नववर्षातही डेंगीच्या डंख कायम; 5 दिवसांतच 11 नवीन रुग्ण

मुस्लीम मोहल्ला, लभडे गल्ली परिसर दाट लोकवस्तीचा आहे. चिंचखेड व उंबरखेड रस्ता,अंबिका नगर,अचानक नगर,डॉ.आंबेडकर नगर परिसरात सर्व्हेक्षणात डास अळ्या आढळल्या आहेत. आरोग्य केद्रांच्या डॉ. वैशाली कदम, डॉ.योगेश धनवटे, डॉ.मंजुश्री पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य सेवेक दीपक चव्हाण,दीपक परदेशी यांच्या पथकाकडून साचलेल्या पाण्याच्या डबक्यामध्ये अळीनाशक औषध टाकणे अशा उपाय योजना सुरु आहेत.

''डेंग्यू आजाराचा संभाव्य धोका टाळण्यासाठी आरोग्य विभागाकडुन देण्यात आलेल्या मागदर्शक तत्वाची अमंलबजावणी करायला हवी.घरातील व परिसरातील डास उत्पत्ती स्थाने आठड्यातुन एकदा कोरडी करावी.झोपतांना मच्छरदाणीचा वापर करावा.''-मयुर चव्हाण(आरोग्य सेवक,पिंपळगांव बसवंत).

Health workers emptying water containers found with mosquito larvae
Nashik Dengue Update : महापालिकेचा वैद्यकीय विभाग खडबडून जागा; डेंगीच्या पार्श्वभूमीवर घरभेटी वाढविल्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.