Nashik Dengue Update : मागील पंधरा दिवसात शहरात डेंगीचे १४ रुग्ण आढळून आल्याने डास उत्पत्तीला कारणीभूत ठरणाऱ्या १६३ जणांना महापालिकेकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
शहरात मोठ्या प्रमाणात डेंगीचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. मागील पंधरवड्यामध्ये १४ डेंगीचे रुग्ण आढळून आले. (Nashik Dengue Update Notices to 163 people due to mosquito outbreak)
त्यामुळे डेंगी बाधितांचा आकडा १३० वर पोचला आहे. जून महिन्याच्या अखेरपर्यंत ११६ डेंगी रुग्ण होते. जुलै महिन्याच्या पहिल्या १५ दिवसात १४ रुग्णांची भर पडली आहे. आता एकूण रुग्णांची संख्या १३० झाली आहे.
त्यामुळे महापालिकेचा वैद्यकीय विभाग अलर्ट मोडमध्ये आला असून, डास उत्पत्ती ठिकाणांचा शोध करण्यास सुरवात करण्यात आली आहे. १६३ ठिकाणी डास उत्पत्ती केंद्र आढळून आल्याने त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
डास उत्पत्ती केंद्र शोधण्यासाठी महापालिकेकडून ६० पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. ६० पथकाने १९ बेसमेंट धारकांना, तर ८० गॅरेज चालकांना नोटीस बजावली आहे.
५६ ठिकाणी अपूर्ण बांधकामे आढळल्याने तेथेदेखील नोटिसा पाठवण्यात आल्या आहे. सात शाळा व एका सेफ्टी टॅंकमध्ये डेंगीच्या आळी आढळून आल्या असून, तेथेदेखील नोटीस बजावली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.