Deolali Assembly Constituency : महाविकास आघाडीसाठी देवळाली गेमचेंजर!

Lok Sabha Constituency : लोकसभेच्या नाशिक मतदारसंघात देवळाली विधानसभा मतदार संघ महत्त्वाची भूमिका निभावू शकतो. यात महाविकास आघाडीसाठी हा मतदार संघ गेमचेंजर ठरण्याची शक्यता आहे.
Deolali Assembly Constituency
Deolali Assembly Constituencyesakal
Updated on

Nashik News : लोकसभेच्या नाशिक मतदारसंघात देवळाली विधानसभा मतदार संघ महत्त्वाची भूमिका निभावू शकतो. यात महाविकास आघाडीसाठी हा मतदार संघ गेमचेंजर ठरण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास देवळालीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यमान आमदारांना देखील धोक्याची घंटा ठरू शकते. (Deolali Assembly Constituency plays important role for Maha Vikas Aghadi)

नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी २० मेस मतदान पार पडले. ४ जून रोजी मतदारांनी कोणाच्या पारड्यात कल टाकला हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मात्र सहा विधानसभा मतदारसंघातून घेतलेला आढावा व चर्चेतून लोकसभा निवडणुकीपूर्वी स्पर्धेत नसलेले महाविकास आघाडीचे उमेदवार तीव्र स्पर्धा करताना दिसत आहे.

यातून देवळाली विधानसभा मतदारसंघ गेमचेंजर ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघांमध्ये पूर्व, पश्चिम व मध्य हे शहरातील तीन विधानसभा मतदारसंघ आहेत. त्याचबरोबर देवळाली हासुद्धा शहरी भागातला मतदार असला तरी महापालिका व कॅन्टोन्मेंट बोर्ड वगळता तालुक्यातील महत्त्वाची गावे या मतदारसंघांमध्ये समाविष्ट आहेत.

तालुक्यातील मतदारांचा कल कोणाच्या बाजूने हे देवळालीचे आगामी निवडणुकीचे भवितव्य ठरवणारा आहे. देवळाली विधानसभा मतदारसंघांमध्ये विद्यमान खासदारांना सन २०१४ व २०१९ च्या निवडणुकीमध्ये मोठे मताधिक्य मिळाले होते. यंदाच्या निवडणुकीमध्ये मात्र देवळालीत महाविकास आघाडी व महायुतीबरोबरच अपक्ष उमेदवार शांतिगिरीजी महाराज यांनी देखील आव्हान निर्माण केले आहे. (latest marathi news)

Deolali Assembly Constituency
Nashik Lok Sabha Constituency : पूर्वमधून महायुतीला लीड; पश्चिम, मध्यकडे लक्ष

यातून देवळाली विधानसभा मतदारसंघांमध्ये मतांचे विभाजन अटळ आहे. विभाजित झालेले मतदान तीन पैकी कुठल्या उमेदवाराला अधिक प्रमाणात मिळते, यातून कल स्पष्ट होईल. महाविकास आघाडीच्या उमेदवाराला अधिक मतदान मिळाल्यास फायदेशीर तर ठरेल त्याशिवाय अपक्ष उमेदवाराला अपेक्षित मतदान झाले तरी महाविकास आघाडीसाठी देखील फायदेशीर ठरणार आहे.

वंचित बहुजन आघाडी हा घटकदेखील देवळालीच्या मतदानावर प्रभाव टाकणारा आहे. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला जितकी मते प्राप्त होतील ते महायुतीचे मतदान विभाजित करणारे ठरेल. त्याचा फायदा आपसूक महाविकास आघाडीलाच होणार आहे. त्यामुळे देवळाली विधानसभा मतदार संघ हा नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये गेमचेंजर ठरेल असे बोलले जात आहे.

Deolali Assembly Constituency
Nashik Lok Sabha Election : निकालाच्या उत्कंठेने नियोजनाची आखणी; उत्तर महाराष्ट्रातील जागांकडे लक्ष

मराठा मतदान निर्णायक

देवळाली विधानसभा मतदारसंघांमध्ये नाशिक महापालिकेचा काही भाग तर कॅन्टोन्मेंट बोर्डाचा शंभर टक्के भाग येतो. त्याचबरोबर भगूर नगरपरिषद हा निमशहरी भाग देखील याच मतदारसंघांमध्ये आहे. मुंगसरा, ओढा, सय्यद पिंपरी, दोनवाडे, राहुरी, लाखलगाव या मराठाबहुल गावांचा समावेश देवळालीमध्ये होतो. मराठा मतदानाची टक्केवारी अधिक आहे.

मागील दोन निवडणुकांमध्ये मराठा मतांचे विभाजन फारसे झाले नाही, मात्र सन २०२४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये मात्र सर्वच प्रमुख उमेदवार हे मराठा समाजाचे आहेत. त्या व्यतिरिक्त प्रत्येक उमेदवाराच्या नातेवाईकांचा गोतावळा व प्रभाव पाडणारा मतदार वर्ग आहे. त्यामुळे मराठा मतांचे विभाजन निश्चित असल्याने गेम चेंजरच्या भूमिकेत ही बाब महत्त्वाचे ठरू शकते.

Deolali Assembly Constituency
Nashik Lok Sabha Code Of Conduct : आचारसंहितेत अडकली टंचाई आढावा बैठक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.