Nashik Tribal Development : आदिवासी विकास विभाग; आश्रमशाळांचे 100 टक्के निकालाचे उद्दिष्ट

Nashik News : आदिवासी विकास विभागांतर्गत आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय विभागाने घेतला आहे.
tribal development department
tribal development departmentesakal
Updated on

Nashik News : आदिवासी विकास विभागांतर्गत आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय विभागाने घेतला आहे. त्यासाठी यंदा आश्रमशाळांना १०० टक्के निकालाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यादृष्टीने आश्रमशाळांना कृति कार्यक्रमही देण्यात आला आहे. आदिवासी आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेबाबत कायमच तक्रारी होत्या. (100 percent result target for ashram schools)

त्यासाठी आदिवासी विकास आयुक्त नयना गुंडे यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर आदिवासी विकास विभागाकडून गेल्या वर्षी विद्यार्थ्यांची क्षमता चाचणी घेतली. या क्षमचा चाचणीतून आदिवासी विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता खालवली असल्याचे निर्दशनास आले होते. चाचणी परीक्षेचे मूल्यमापन फारसे समाधानकारक नसल्याने विभागाने २०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासून आदिवासी विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीवर लक्ष केंद्रित केले आहे.

याचाच भाग म्हणून आदिवासी आयुक्तालयात शिक्षण विभागाची २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाच्या नियोजनाची बैठक झाली. बैठकीत आगामी शैक्षणिक वर्षात सेतू अभ्यासक्रमाची अमंलबजावणी, आधारकार्ड प्रमाणीकरण, कृतिपुस्तिका सोडविणे, सीएमसी निधीची उपलब्धता आदींचे उद्दिष्टे निश्चित करण्यात आली.

राज्यातील सहायक प्रकल्प अधिकारी (शिक्षण) यांच्यासाठी विशेष कृतीसत्राचे आयोजनही या वेळी करण्यात आले होते. या सत्रात २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीवर सविस्तर चर्चा झाली. आगामी शैक्षणिक वर्षातील उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी शिक्षक-मुख्याध्यापकांसह प्रशासकीय अधिकाऱ्यांनी प्रयत्न करण्याचे आवाहन आदिवासी विकास विभागाकडून या वेळी करण्यात आले. (latest marathi news)

tribal development department
Nashik Police Transfer : बदल्यांनी ‘कहीं खुशी... कहीं गम’! बदल्या करून आयुक्त आठवडाभर सुट्टीवर

सहाय्यक प्रकल्प अधिकारी (शिक्षण) वर्षा सानप व ‘एलएफई’चे शैलेश तवर यांनी मार्गदर्शन केले. आयुक्त गुंडे, अपर आयुक्त (मुख्यालय) तुषार माळी, सहआयुक्त शिक्षण संतोष ठुबे, सहायक आयुक्त शिक्षण दिलीप खोकले आदी उपस्थित होते.

"आदिवासी विकास विभागाकडून शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. यंदाच्या शैक्षणिक वर्षात दहावी व बारावीचा निकाल १०० टक्के लावण्यासाठी आश्रमशाळांना कृतिकार्यक्रम दिला आहे. नियमित अभ्यासक्रमांसमवेत विविध उपक्रम राबविले जाणार असून, त्या माध्यमातून आदिवासी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्वक शिक्षण देण्याचा प्रयत्न आहे." - नयना गुंडे (आयुक्त, आदिवासी विकास विभाग)

tribal development department
Nashik Police : नाशिक ग्रामीण पोलीस दलाच्या ताफ्यात 75 दुचाक्या सामील; पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.