Nashik Road Damage : धुळ, कच ठरतेय डोकेदुखी...! शहरातील रस्‍त्‍याची दयनीय अवस्‍था, गंभीर आजारांचा धोका वाढला

Road Damage : पावसाने उघडीप दिलेली असतानाही रस्‍ते दुरुस्‍तीच्‍या कामांना अद्याप बऱ्याच ठिकाणी मुहूर्त लागलेला नाही.
Dwarka area dust.  Potholes in the square near Sibal Hotel on Trimbak Road
Dwarka area dust. Potholes in the square near Sibal Hotel on Trimbak Roadesakal
Updated on

नाशिक : पावसाने उघडीप दिलेली असतानाही रस्‍ते दुरुस्‍तीच्‍या कामांना अद्याप बऱ्याच ठिकाणी मुहूर्त लागलेला नाही. आधीच रस्‍त्‍यांची चाळण झालेली असताना, हवेत वाढत असलेले धुळीचे प्रमाण आरोग्‍यासाठी धोकादायक ठरत आहे. डोळ्यांच्‍या संसर्गासह इतर तक्रारींमध्ये जवळपास २५ टक्‍के प्रमाण वाढले आहे. गंभीर आजारांचा धोका बळावत आहे. त्‍यामुळे तातडीने रस्‍ते दुरुस्‍ती काम हाती घ्यावे, व कच, धुळ नियंत्रणात आणण्यासाठी आवश्‍यक स्‍वच्‍छता करावी अशी अपेक्षा नागरिकांकडून व्‍यक्‍त होते आहे. (deplorable condition of roads in city increased risk of serious diseases)

शहरातून जाणारे महामार्ग, त्‍यालगतचे सर्व्हिस रोड आणि शहरांतर्गत रस्‍त्‍यांवर ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहे. यापूर्वी खड्डे बुजविण्यासाठी केलेल्‍या कामातील कच, खडीचे कण हवेत मिश्रण होऊन नागरिकांसाठी अपायकारक ठरत आहे. वायु प्रदूषणात भर पडली असून, यामुळे नागरिकांमध्ये सौम्‍य ते दीर्घ काळातील आरोग्‍य समस्‍या उद्भवत आहेत.

नेत्रविकारात भर..

धुळ, धुलीकण डोळ्यांमध्ये जाऊन संसर्ग झाल्‍याचे सर्वाधिक प्रकार समोर येतात. याशिवाय पीएम १० स्‍तरावरील मोठ्या कणांमुळे डोळ्यातील रक्‍तवाहिन्‍या, बुबुळाला इजा होऊ शकते. डोळ्यांना खास येणे, वेदना होणे, सुज येण्याची लक्षणे देखील जाणवतात.

या भागांमध्ये समस्‍या गंभीर

- द्वारका ते नाशिक रोड दरम्‍यान ठिकठिकाणी खोल खड्डे

- उपनगर व परिसरात खड्यांमध्ये रस्‍ता, चालकांची तारांबळ

- फेम थिएटर सिग्‍नलजवळ चारही बाजूंनी साचलेय कच

- द्वारका सर्कल सभोवतालच्‍या सर्व्हिसरोडवर धुळीचे साम्राज्‍य

- गंजमाळ सिग्‍नल, शालिमार परिसरातही धुलीकणांमुळे डोकेदुखी

- गंगापूररोडला अंतर्गत रस्‍त्‍यांची झाली चाळण

- कॅनडा कॉर्नर सिग्‍नलवर धुळीचा त्रास

- त्र्यंबकरोडवर सैनिकी वसतीगृहाजवळील रस्‍त्‍यावर कच

- पी ॲण्ड टी कॉलनीच्‍या रस्‍त्‍यावर धूळच धुळ

- एबीबी सर्कल सिग्‍नलवर खड्डे, धुळीमुळे वाहनचालक त्रस्‍त

- आरडी सर्कल ते सिटी सेंटर मॉल सिग्‍नलपर्यंतचा रस्‍ता धुळीने माखलेला

- त्रिमुर्ती चौक खड्यात, माऊली लॉन्‍स, अभियंता नगरमध्येही खड्डे, धुळ

- खुटवडनगरला धुळीचा त्रास, नागरी वसाहतीत धुलीकणांमुळे मनस्‍ताप

- पेठरोडला राउ हॉटेलपर्यंत धुळच धुळ, दिंडोरी रोडलाही परिस्‍थिती भयंकर

- जुना आडगाव ते आडगावपर्यंतच्‍या सर्व्हिसरोडवर खड्डे, धुळ

- छत्रपती संभाजीनगर मार्गावरील खड्डे चुकवितांना अपघातांचा धोका

- तपोवन लिंकरोडवर ठिकठिकाणी खड्डे, धुळीमुळे चालकांना त्रास

- काठे गल्‍ली, त्रिकोणी गार्डन रस्‍त्‍यावर रस्‍त्‍याची चाळण

- भाभानगरचा संपूर्ण मुख्य रस्‍त्‍यात खड्डेच खड्डे. (latest marathi news)

Dwarka area dust.  Potholes in the square near Sibal Hotel on Trimbak Road
Nashik Road Damage : खंबाळे-म्हसगण रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य; वाहनचालकांची कसरत

कार्बन मोनोक्‍साईडचा हवेतील स्‍तर चिंताजनक

कार्बन मोनोक्‍साईड (सीओ) ची पातळी धोकादायक राहते आहे, असून ही बाब चिंतेत टाकणारी आहे. कार्बन मोनोक्‍साईडमुळे मेंदूसह शरीरातील विविध अवयवांना पुरेसे ऑक्सिजन मिळत नसून, दीर्घकालीन गंभीर आजार उद्‌भवण्याचा यामुळे धोका निर्माण झालेला आहे. डोकेदुखी, थकवा, अशक्‍तपणा आदी सौम्‍य स्‍वरुपाचे आजार सद्यःस्‍थितीत अनेकांमध्ये उद्भवत आहेत.

महापालिका प्रशासनाने तातडीने राबवावी मोहीम

रस्‍त्‍याच्‍या दुरवस्‍थेमुळे नागरिकांच्‍या आरोग्‍यावर होणारे गंभीर परिणाम पाहता, महापालिका प्रशासनाने तातडीने मोहीम राबविण्याची आवश्‍यकता व्‍यक्‍त होते आहे. याअंतर्गत रस्‍त्‍यावर साचलेला कच स्‍वच्‍छ करणे तसेच खड्यांमध्ये योग्‍य पद्धतीने डागडुजी करण्याची गरज आहे. शहरासह उपनगरीय भागांमध्ये स्‍वच्‍छता करताना केवळ कचरा उचलू नये, तर त्‍यासोबत रस्‍त्‍यांच्‍या कडेला साचलेले मातीचे खच उचलले जावे. दुभाजकांतून रस्‍त्‍यावर माती पडणार नाही, याची खबरदारी घ्यावी.

काय घ्याल काळजी..

- सार्वजनिक ठिकाणी चष्मा, गॉगलचा करावा उपयोग

- कामानिमित्त बाहेर पडतांना मास्‍कने चेहरा झाकावा

- उपरणे, स्‍कार्पचा उपयोग ठरु शकतो फायदेशीर

- दुचाकी वाहन चालविताना हेल्‍मेटचा वापर टाळतो संसर्ग

- बाहेर आल्‍यावर थंड पाण्याचे चेहरा व डोळे धुतलेले चांगले

- डोळ्यात धुलीकण गेल्‍यास डोळे चोळू नये.

- डोळे सारखे लाल राहात असल्‍यास नेत्रविकार तज्‍ज्ञांचा सल्‍ला घ्यावा

- कोरडा खोकला दीर्घ काळ असेल, तर तपासून घ्यावे.

- घरात खिडक्‍या, बाल्‍कनीला धुळ प्रतिरोधक जाळी वापरावी

- श्‍वसनाशी निगडीत योगासन ठरतो उपयोगी

''नेहमीपेक्षा नेत्रविकारांच्‍या रुग्‍णांमध्ये २५ ते ३० टक्क्यांनी वाढ झालेली आहे. हवेतील धुळ, धुलीकण किंवा अन्‍य घटक डोळ्यांमध्ये जाऊन इजा करु शकतात. सौम्‍य ते गंभीर परिणाम उद्‌भवण्याची भीती असल्‍याने लक्षणांकडे दुर्लक्ष न करता डॉक्‍टरांचा सल्‍ला घ्यावा. डोळ्यांना इजा टाळण्यासाठी प्रतिबंधात्‍मक उपायांवर भर द्यावा.''- डॉ.राजश्री कुटे, नेत्रविकार तज्‍ज्ञ.

''धुळीचे कण श्‍वसनावाटे फुफ्फूसापर्यंत पोहोचल्‍यास गंभीर परिणाम उद्‌भवू शकतात. लवकर बरा न होणारा कोरडा खोकला हे आजाराचे एक लक्षण आहे. नागरिकांनी काळजी घेतांना मास्‍क, उपरणे, स्‍कार्पचा वापर करावा. लक्षणांकडे दुर्लक्ष करु नये.''- डॉ. समीर चंद्रात्रे, चेष्ट फिजिशियन.

Dwarka area dust.  Potholes in the square near Sibal Hotel on Trimbak Road
Nashik Damaged Roads : बांधकाम विभागाकडून रस्त्यांची झाडाझडती! दोष निवारण कालावधीतील रस्त्यांची यादी मागविली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.