सुरगाणा : आदिवासी बांधवांनो, घाबरू नका, केंद्र व राज्य सरकार तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे. संविधान कुणीही बदलू शकत नाही, तसा नारा लावणाऱ्यांकडे लक्ष देऊ नका, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुरगाणा येथे शुक्रवारी (ता. २) सांगितले. श्री. पवार यांच्या हस्ते ९१९ कोटी ४० लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण झाले. त्या वेळी ते बोलत होते. (Nashik Deputy Chief Minister Ajit Pawar saura at surgana statement Govt stands by tribals marathi news)
मी सत्तेसाठी हपापलेलो नाही. कधी सरकारमध्ये, तर कधी विरोधी पक्षनेता म्हणून काम केले आहे. राज्यातील जनतेच्या विकासासाठी मी झगडणारा आहे. कळवण-सुरगाणा मतदारसंघात २२ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून दिला आहे. तिजोरीच्या चाव्या माझ्या हाती आहेत.
राज्य दिवाळखोरीत काढले, असा आरोप होतोय, पण व्यवहार मलाही कळतो. लाडकी बहीण योजना तसेच इतर योजना निवडणूक संपली की योजना बंद होतील, असा अपप्रचार विरोधक करीत आहेत, हे कदापि होणार नाही. मी राज्य सरकारचा प्रतिनिधी आहे, गैरसमज व फसवेगिरी करणार नाही. (latest marathi news)
आदिती तटकरे यांनी तालुक्यात स्मार्ट अंगणवाडी निर्माण करायच्या आहेत. पर्यटनस्थळ निर्माण केले जाणार असून, सुशिक्षित बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. लाडकी बहीण योजनेत अधिवास प्रमाणपत्राची अट रद्द केली आहे. नरहरी झिरवाळ, आमदार नितीन पवार यांचीही भाषणे झाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.