Nashik Encroachment : अतिक्रमणधारकांना उपायुक्तांची तंबी; दुकानासमोरील पिवळ्या लाइनच्या आत व्यवसाय करावा

Encroachment : अतिक्रमण उपायुक्त आले आणि गेले... अतिक्रमण मात्र ‘जैसे थे’ राहिले, अशा प्रकारची चर्चा मेन रोड परिसरात रंगली होती.
Encroachment Deputy Commissioner Mayur Patil and staff during inspection tour of encroachments in Main Road area.
Encroachment Deputy Commissioner Mayur Patil and staff during inspection tour of encroachments in Main Road area.esakal
Updated on

Nashik Encroachment : अतिक्रमण उपायुक्त आले आणि गेले... अतिक्रमण मात्र ‘जैसे थे’ राहिले, अशा प्रकारची चर्चा मेन रोड परिसरात रंगली होती. बुधवारी (ता. ७) त्यांनी कर्मचाऱ्यांसह पोलिस बंदोबस्तात पायी मेन रोड बाजारपेठेचा दौरा केला. व्यावसायिकांची चर्चा करत अतिक्रमण करू नये, अशी तंबी दिली. दौरा करण्याची त्यांची तिसरी वेळ आहे. तरीदेखील अतिक्रमणधारकांवर कुठलाही परिणाम झाला नाही, अशा प्रकारच्या चर्चेस उधाण आले होते. (Deputy Commissioner warning to encroachers )

मेन रोड, शालिमार बाजारपेठ अतिक्रमण पथकाकडून रस्त्यावर बेकायदेशीर अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई करत पथक पुढे जात नाही तोच पुन्हा व्यावसायिकांकडून अतिक्रमण केले जात असते. त्यामुळे येथील मोहीम केवळ कुचकामी ठरत असते. महापालिकेस नेहमी अनेक तक्रारी प्राप्त होत असतात. अतिक्रमण उपायुक्त मयूर पाटील यांनी मात्र अतिक्रमण विभागाचा पदभार स्वीकारताच अतिक्रमण कारवाईचा धडाका लावला होता. त्यामुळे मुख्य बाजारपेठेतील अतिक्रमणास घेऊन नागरिकांच्या त्यांच्याकडून अपेक्षा वाढल्या होत्या. (latest marathi news)

Encroachment Deputy Commissioner Mayur Patil and staff during inspection tour of encroachments in Main Road area.
Nashik Encroachment : आकाशवाणी केंद्र भागातील अतिक्रमण हटविले

महापालिका अधिकारी कर्मचाऱ्यांसह पोलिस बंदोबस्तात त्यांनी रविवार कारंजा येथून पायी दौऱ्यास सुरुवात केली. प्रथम रविवार कारंजा येथील व्यावसायिकांशी चर्चा केली. विविध भागातील व्यावसायिकांशी चर्चा करत अतिक्रमण करणाऱ्या व्यावसायिकांना तंबी दिली. दुकानाच्या मर्यादेत व्यवसाय करावा अन्यथा कारवाईस सामोरे जावे लागेल, असा सज्जड इशारा दिला. पाहणी करून उपायुक्त पाटील पुढे जात नाही तोच परिस्थिती ‘जैसे थे’ झालेली दिसून आली.

पिवळ्या लाइनच्या आत व्यवसाय

व्यावसायिकांनी दुकान थाटण्यासंदर्भात जागा निश्चित करण्याची मागणी केली. येत्या दोन ते तीन दिवसांत महापालिकेकडून बाजारपेठेत व्यावसायिकांच्या दुकानासमोर पिवळ्या लाइन केल्या जातील. लाइनच्या आत व्यवसाय करावा, अन्यथा कारवाई केली जाणार असल्याची तंबी त्यांनी दिली.

Encroachment Deputy Commissioner Mayur Patil and staff during inspection tour of encroachments in Main Road area.
Nashik Encroachments : तिसऱ्या दिवशी 30 अतिक्रमणे उद्‌ध्वस्त! अतिक्रमण विभाग ॲक्शन मोडमध्ये

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.