Nashik Teacher Union : महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक महासंघाच्या प्रयत्नांतून कलाशिक्षकांच्या विविध मागण्यांची पूर्तता करण्याबाबत शिक्षण उपसंचालक डॉ. बी. बी. चव्हाण यांनी आदेश काढले आहेत. नाशिक विभागातील सर्व माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना हे पत्र पाठविण्यात आले असून, मागण्यांची पूर्तता होत असल्याने कलाशिक्षकांनी समाधान व्यक्त केले आहे. महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रल्हाद साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रदेश सरचिटणीस प्रल्हाद शिंदे (छत्रपती संभाजीनगर) यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने कलाशिक्षकांच्या विविध मागण्यांसंदर्भात शिक्षण उपसंचालक डॉ. चव्हाण यांच्याशी सखोल चर्चा केली. (nashik Deputy Director of Education Dr B B Chavan has issued orders marathi news)
त्याअंती, विविध शासन जी. आर. संदर्भान्वये कलाशिक्षकांना मोठा दिलासा मिलाला आहे. शिष्टमंडळाने कलाशिक्षकांच्या विविध मागण्यांची माहिती दिली. कलाशिक्षकांच्या कार्यालयीन कामांना ठिकठिकाणी अडविले जाते याची माहिती दिली, यावर डॉ. चव्हाण यांनी विभागातील सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना लेखी आदेश काढून मागण्यांची पूर्तता करण्यास सांगितले.
मागण्यांमध्ये कलाशिक्षकांच्या रखडलेल्या पदवीधर समकक्ष वेतनश्रेणीच्या प्रस्तावांना पास दिनांकापासून मान्यता देणे, कलाशिक्षकांची रखडलेली वेतन देयके मंजूर करणे, कलाशिक्षकांचा ‘क’ संवर्गात समावेश करून सेवाज्येष्ठता यादी तयार करणे, कला व कार्यानुभव विषयाच्या तासिका देणे, अधिकाधिक विद्यार्थ्यांना शासकीय चित्रकला परीक्षांसाठी प्रविष्ट करणे या मागण्यांचा समावेश होता. (latest marathi news)
पवित्र पोर्टल अंतर्गत कलाशिक्षक पद भरती करण्याकामी पाठपुरावा करणे, एक तुकडी शाळेला एक कलाशिक्षक पद भरती करणे आवश्यक करणे, कलाशिक्षकांची वरिष्ठ वेतनश्रेणी सेवाज्येष्ठता बिले तत्काळ मंजूर करणे, चौकशीच्या फेऱ्यात अडकलेल्या शालार्थ आयडी प्रकरणातील बिले विनाविलंब मंजूर करण्यात यावीत आदी सर्व मागण्यांवर चर्चा होऊन सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना लेखी आदेश देण्यात आले.
उपसंचालकांच्या आदेशानंतर सर्व पदाधिकाऱ्यांनी नाशिक जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील यांची भेट घेऊन त्यांना शिक्षण उपसंचालकांनी काढलेल्या लेखी आदेशाबाबत अवगत केले, त्यांनीही नियमानुसार कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
मागण्या मंजूर करण्यासाठी प्रदेश सरचिटणीस प्रल्हाद शिंदे, प्रदेश सदस्य रमेश तुंगार, विभागीय अध्यक्ष चंद्रशेखर सावंत, नाशिक जिल्हाध्यक्ष दत्तात्रय सांगळे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पगार, जिल्हा सचिव राजेंद्र लोखंडे, उपाध्यक्ष मिलिंद टिळे यांच्यासह पदाधिकारी व महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.