Nashik News : महाराष्ट्र कारागृह प्रशासनाने जेल रोडला नाशिक विभाग कारागृह उपमहानिरीक्षणालय स्थापन केले आहे. या कार्यालयाच्या अखत्यारीत नाशिक रोडसह आठ कारागृहांचा समावेश करण्यात आला आहे.
या नवीन नाशिक विभागामुळे कारागृह प्रशासन, कर्मचारी, कैदी यांच्याशी निगडित व इतर कामेही वेगाने पूर्ण होण्यास मोलाचे साहाय्य होणार आहे. (Nashik deputy inspector general speed up works nashik news)
अप्पर पोलिस महासंचालक व महानिरीक्षक अमिताभ गुप्ता, कारागृह उपमहानिरिक्षक यु. टी. पवार यांच्या हस्ते या कार्यालयाचे उद्घाटन झाले. या वेळी नाशिक रोड कारागृह अधीक्षक अरुणा मुगुटराव, उपअधीक्षक सचिन चिकणे, राजेंद्र देशमुख, प्रदीप जगताप, विशाल बांदल, अनिल वांडेकर, तुरुंगाधिकारी विलास साबळे, मोहसीन शेख, संतोष खारतोडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
छत्रपती संभाजीनगर मध्य विभागाचे विभाजन करून स्वतंत्र नाशिक विभाग कारागृह उपमहानिरीक्षणालय सुरू करण्यात आले आहे. राज्यात कारागृह प्रशासनाचे कामकाज चार विभागात चालत होते. कारागृह प्रशासन, कर्मचारी, कैद्यासंदर्भातील कामे त्वरित होण्यासाठी नाशिक विभाग उप महानिरीक्षणालयाची निर्मिती करण्यात आली.
या विभागात नाशिक रोड, धुळे, जळगाव, नंदुरबार, भुसावळ, नाशिक किशोर सुधारलय, अहमदनगर, विसापूर या आठ कारागृहाचा समावेश करण्यात आला आहे. अमिताभ गुप्ता म्हणाले, की कारागृह परिसरात जामर लावल्यास आजूबाजूचे रहिवासी तक्रार करतात. रेंजची फ्रिक्वेन्सी वाढल्यावर जामरची मदत होत नाही.
कारागृहात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले असून नियमित तपासणी केली जाते. कैद्यांना अधिकृतपणे फोनवरून कुटुंबाशी बोलण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्याने कारागृहात मोबाईल व सीमकार्ड सापडण्याच्या घटना कमी झाल्या आहेत.
नाशिक विभाग कार्यालयासाठी कारागृह उपमहानिरिक्षक, स्वीय सहाय्यक, लघुलेख व तुरुंगाधिकारी क्लास वन, कार्यालयीन अधीक्षक व पोलिस उपनिरीक्षक तसेच तुरुगांधिकारी क्लास टू, वरिष्ठ लिपिक व कनिष्ठ लिपिक, शिपाई आदी २५ नवीन पदांची निर्मिती करण्यात आली आहे. कारागृह उपमहानिरिक्षक यु. टी. पवार यांनी स्वागत केले. प्रास्ताविक नाशिकरोड कारागृह अधीक्षक अरुणा मुगुटराव यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.