Nashik News : ऑनलाइन कामकाज होऊनही रांगा कायम; मालेगाव स्टेट बँकेतील गर्दीने नागरिकांचे हाल
मालेगाव : अनेक वर्षापासून सर्वच बँकांत ऑनलाइन व्यवहार सुरू झाले. मोबाईलच्या माध्यमातून व्यवहार होतात. भारतीय स्टेट बँकेच्या तीन शाखा असूनही बॅक ग्राहकांची गर्दी मालेगावात कमी होत नाही. ऑनलाइन कामकाज सुरु झाले असले तरी, रोज सकाळी दहा ते दीड दरम्यानची रांग ही नित्याचीच झाली आहे. (Despite having 3 branches of State Bank of India crowd of back customers does not decrease in Malegaon)
ग्रामीण भागात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर खाते असल्याने शेतकरी पीक कर्जासह, कर्मचारी गृह कर्जाच्या प्रकरणांना मोठा विलंब होत असल्याने नाराजी आहे. दोन वर्षांपूर्वी गृहकर्ज व इतर सुविधा तातडीने मंजूर होत. सर्व कर्ज प्रकरणांचा निपटारा पाथर्डी फाटा,नाशिक येथील कार्यालयात जिल्हा भरातील सर्व ग्राहकांना जावे लागते.
ऐन खरीपात त्रास
कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना वारंवार बॅंकेकडे चकरा माराव्या लागतात. शेतकऱ्यांना ऐन शेती मशागतीच्या कामात,पिक पेरणीच्या काळात वेळेत पैसे मिळत नसल्याने खासगी सावकारांच्याकडे जावे लागत असल्याची शेतकऱ्यांची कैफियत आहे. सटाणा नाका परिसरातील नागरिकांसाठी तेरा वर्षापासून नवीन शाखा सुरू झाली. पाच वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात एक नवीन शाखा सुरू झाली आहे. काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरीही नागरिकांना प्रचंड गर्दीत तासन् तास ताटकळत रहावे लागते.
कायमच रांगा
कर्मचारी, शेतकरी, व्यापाऱ्यांचेही खाते स्टेट बँकेत असल्याने शासनाच्या योजना,कृषी कर्ज, पगार खातेदारांना ऑनलाइन बँकीग सुविधा, योनो ॲप, मोबाईल बँकींग वापरण्यात अडचणीमुळे अनेक जण समक्ष येतात. (latest marathi news)
त्यामुळे दरदिवशी पासबुकला बारकोड लावणे, खात्याचे केवायसी, नवीन चेक पुस्तक मागणी, मोबाईल बॅंकिंग सुविधा अर्ज, बॅंक पासबुक बदलणे, पासबुक व्यवहार नोंदवून घेणे, एटीएम मागणी करणे या सोयी- सुविधांसाठी स्वतंत्र खिडकी असून,त्यातच जनधन खातेदारांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याने इतर ग्राहकांना तासनतास उभे रहावे लागते.
"वयोवृद्ध व महिला यांना जास्त वेळ रांगेत रहावे लागते. आमच्या वेळेची बचत होईल, गर्दी कमी होईल याकडे बॅक प्रशासनाने लक्ष द्यावे. ग्राहकांना तत्पर सुविधा बाबत उपाययोजना कराव्यात." - राणी गायकवाड. बॅंक खातेदार, पोलिस पाटील, चंदनपुरी.
"शेतकरी मुदतीच्या आत वेळेत कर्ज भरण्यासाठी पैशांचा उधार उसनवारीसह जोड जुगाड करून आणतो. इथं भरणा करून घेण्यात अडचणी येतात. भरले तरी लवकर पुढचे कर्ज नुतनीकरण होत नाही. दोन दिवसांच्या कामाला पंधरा दिवस लागतात." - संदीप शिंदे, शेतकरी खातेदार, शेंदुर्णी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.