चांदवड : कोट्यवधी रुपये खर्चून बंधारे बांधले; पण पाणी नाही साचले' अशी अवस्था शिंगवे (ता. चांदवड) येथील नदीवर लघुपाटबंधारे विभागाने (स्थानिक स्तर) बांधलेल्या कोल्हापूर टाइप बंधाऱ्यांची झाली आहे. या बंधाऱ्यांना पावसाळा संपला तरी दरवाजे बसविले नसल्याने एकाच नदीवर गेल्या दीड वर्षांपूर्वी बांधलेल्या पाच बंधाऱ्यांमध्ये पाणी तुंबले नाही.
हे बंधारे भरलेच नाही. आजही सगळे पाणी वाहून जाते आहे. शासनाचे कोट्यवधी रुपये पाण्याबरोबर वाहून जाते आहे तरीही या बंधाऱ्यांची जबाबदारी असलेल्या विभागाने ते आमचे काम नाही तर ग्रामपंचायतीचे आहे असे सांगितले आहे. याबाबत शिंगवे ग्रामपंचायतीच्या लोकप्रतिनिधी यांच्याशी संपर्क साधला असता तो झाला नाही. (Despite heavy rain embankment remains dry)