Nashik News : सातशेपार दर होऊनही खवय्यांची पसंती मटणालाच

Nashik : रविवार (ता.४) च्या दीप अमावस्येच्या पार्श्‍वभूमीवर मटण, चिकन व्यावसायिक सज्ज झाले आहेत.
meat dish
meat dish esakal
Updated on

Nashik News : रविवार (ता.४) च्या दीप अमावस्येच्या पार्श्‍वभूमीवर मटण, चिकन व्यावसायिक सज्ज झाले आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा दरांत किरकोळ वाढ झाली आहे. दरम्यान बोकडाच्या मटणाचे दर सातशेपार होऊनही खवय्यांची पहिली पसंती बोकडाच्या मटणालाच राहण्याची शक्यता विक्रेत्यांनी वर्तविली आहे. हिंदू धर्मियांत श्रावण मास हा व्रत वैकल्याचा महिना म्हणून ओळखला जातो. (Despite price of 700 preference of people is still mutton )

या काळात खवय्ये मांसाहारापासून दूर राहतात. मात्र तत्पूर्वी दीप अमावस्येला खवय्यांची पसंती मांसाहाराला अधिक असते. ही संधी हेरत नॉनव्हेज विक्रेत्यांनी मोठी तयारी केली आहे. मात्र पावसामुळे व्यवसायावर परिणाम होण्याची भीतीही अनेक व्यावसायिकांनी व्यक्त केली. कोरोनापासून मटणाला मागणी वाढल्याने त्याचे दर सातशेपार गेले आहेत, तरीही मागणीवर फारसा परिणाम झालेला नाही, हे मटण घेण्यासाठी लागलेल्या रांगांवरून दिसून येते.

शहरात विक्रेत्यांची पसंती सगुणा चिकनला असली तरी अनेकजण जिल्ह्याबाहेरील छोट्या पोल्ट्रीफार्मकडून जिवंत चिकन खरेदी करतात, असे काही विक्रेत्यांनी सांगितले. पावसाळ्यात समुद्रातील मच्छीमारी बंद असते, त्यामुळे मच्छी खवय्यांची या काळात गोड्या पाण्यातील माशांना पसंती असते. शिवाय हे मासे खाऱ्या पाण्यातील मच्छीपेक्षा स्वस्त असल्याने अनेक जणांची पसंती गोड्या पाण्यातील माशांना असते. (latest marathi news)

meat dish
Nashik News : वर्दळीच्या सिग्नलवर भिकाऱ्यांच्या संख्येत वाढ! भिक्षेसाठी लहान मुलांबरोबर ज्येष्ठांचाही होतोय वापर

मटण, चिकनचे दर -

बोकडाचे मटण - ७०० ते ८०० रू. किलो.

गावठी -३३० ते ४०० (जिवंत)

जिवंत बॉयलर - १६० ते १८०

तयार बॉयलर - २२० ते २५०

गटारी नव्हे गताहार

काही लोक दीप अमावस्येला गटारी अमावस्या म्हणतात. हे चुकीचे असल्याचा मेसेज समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. हिंदू धर्मियात आषाढी अमावास्येनंतर आहारात बदल केला जातो. या दिवसाला गताहारी (मागे जो आहार घेतला तो) अमावस्या म्हणतात. हिंदूमधील बहुसंख्य सणांची नावे संस्कृतवर आधारित आहेत. मात्र गटारी हा शब्द खोडसाळपणे जोडण्यात आला असून खरा शब्द गताहार आहे. श्रावण महिन्यात मांसाहार न करण्याबाबत शास्त्रीय कारणेही आहेत.

''उद्या अमावस्या असली तरी पावसाच्या संततधारेमुळे कितपत व्यवसाय होईल, याबाबत साशंकता आहे. मात्र या क्षेत्रातील अनेक व्यावसायिकांनी त्यासाठी आधीच मोठी गुंतवणूक केली आहे, त्यामुळे भावांत किरकोळ वाढ झाली आहे.''- मनोज परेवाल, संचालक, दादाज चिकन

meat dish
Nashik News : गटारीची पार्टी बेतली जीवाशी! तानसा नदीपात्रात एकाचा मृत्यू; तिघे बचावले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.