Nashik News : महानुभाव साहित्याचे ‘डिजिटलायझेशन’ : देवेंद्र फडणवीस; महानुभाव पंथाव्दारे फडणवीस यांचा सत्कार

Latest Nashik News : या समग्र महानुभाव साहित्याचे ‘डिजिटलायझेशन’ करून ग्रंथांचा विचार पुढील पिढ्यांसाठी जागता ठेवण्याचे काम केले जाईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
Mahant Karanjekar Baba felicitating Deputy Chief Minister Devendra Fadnavis in the gratitude function organized by Akhil Bharatiya Mahanubhava Panth.
Mahant Karanjekar Baba felicitating Deputy Chief Minister Devendra Fadnavis in the gratitude function organized by Akhil Bharatiya Mahanubhava Panth.esakal
Updated on

Nashik News : ‘सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीं’ यांच्या काळात धर्मावर आक्रमण होत होते, समाज दुभंगलेला होता. मात्र, या प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी समाजाचा धर्मविचार टिकवून धरण्याचे काम केले. धार्मिक, वैचारिक विषमतेला विरोध करून समाजमन उध्दरणारे विपुल साहित्य मराठी भाषेत महानुभाव पंथाने निर्माण केले.

या समग्र महानुभाव साहित्याचे ‘डिजिटलायझेशन’ करून ग्रंथांचा विचार पुढील पिढ्यांसाठी जागता ठेवण्याचे काम केले जाईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. (fadanvis statement Digitalisation of Mahanubhava literature)

अखिल भारतीय महानुभव पंथाव्दारे शनिवारी (ता.२८) कालिदास कलामंदिर येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी श्री. फडणवीस बोलत होते. अध्यक्षस्थानी महानुभाव पंथाचे कवीश्वर कुलाचार्य महंत कारंजेकर बाबा उपाख्य मोहनदादा होते.

व्यासपाठीवर महंत सुकेणेकरबाबा, महंत चिरडेबाबा, आमदार सीमा हिरे, प्रा. देवयांनी फरांदे, अॅड. राहुल ढिकले, माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार, आयोजक बाळासाहेब सानप, प्रकाश नन्नावरे, राजेंद्र जायभावे, दिनकर पाटील, दत्ता गायकवाड, पुंजाभाऊ सांगळे, प्रभाकर भोजणे, अविनाश ठाकरे आदी उपस्थित होते.

श्री. फडणवीस सत्काराला उत्तर देताना म्हणाले, ‘महाराष्ट्र’ व ‘मराठी भाषा’ हे स्वाभिमानाचे विषय आहेत. आमच्या मागील सरकारने जेथे मराठीतील आद्यग्रंथ लिहिला गेला, त्या रिध्दपूर क्षेत्रीच मराठीचे विद्यापीठ साकारण्याचे प्रयत्न सुरू केले होते. आमच्या सरकारने हे विद्यापीठ रिद्धपूरलाच आणले आहे. भारतभरातून मराठीचे विद्यापीठ बघण्यास नागरिक येतील, असे विद्यापीठ आम्ही साकारू असेही फडणवीस म्हणाले.

पाठीशी राहा, मागण्या पूर्ण करू

महानुभाव पंथाने धर्म-संस्कृतीसाठी दिलेले योगदान कुणीही विसरू शकणार नाही. आज या पंथासमोर असंख्य आव्हाने असतानाही त्यांनी कधीही मोर्चे आणले नाहीत की मागण्याही केल्या नाहीत. सलग तीन दशकांपेक्षा अधिक काळापासून या पंथाशी माझा संबंध आला आहे. पुढेही पाठीशी राहिलात तर पुढील पाच वर्षात पंथाची एकही मागणी आम्ही अपूर्ण ठेवणार नाही , असे आश्वासन त्यांनी दिले.

ही स्थाने मुक्त करावीत

महंत कारंजेकर बाबा म्हणाले की, फडणवीस यांच्यामुळे महानुभाव पंथाचे विचार पहिल्याच अर्थसंकल्पात दिसून आले. रिध्दपूरला मराठी भाषेचे विद्यापीठ देण्यासह स्थानांच्या विकासाचे मोठे काम त्यांनी केले आहे.

गुजरात राज्यात श्री. चक्रधर स्वामी यांचे जन्मस्थान असलेला राजवाडा असून तो पुरातत्त्व विभागाने ताब्यात घेतला आहे. या जन्मस्थानावर मदरसा चालतो. रिध्दपूर येथील स्थान मशिदीच्या जागेत आहे. ही स्थान मुक्त करण्यात यावी, जन्मस्थान भाविकांसाठी खुले करण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली. (latest marathi news)

Mahant Karanjekar Baba felicitating Deputy Chief Minister Devendra Fadnavis in the gratitude function organized by Akhil Bharatiya Mahanubhava Panth.
Khaparkheda : बसथांबा तर आहे, प्रवासी निवारा नाही! खापरखेडा रेल्वे चौकी येथे उन्ह, वारा पावसात करावी लागते बसची प्रतीक्षा

फडणविसांचा खास सत्कार

स्वातंत्र्यपूर्व काळापासून महानुभाव पंथांची असलेली मागणी श्री. फडणवीस यांनी पूर्ण केली आहे. महानुभाव हा समाज नसून विचार आहे. हा समाज समृध्द झाला की, मराठी भाषा, संस्कृती समृध्द होणार आहे.

त्यासाठी महानुभावपंथाचे विचार जपण्याचे काम त्यांनी केल्याचे महंत चिरडेबाबा यांनी सांगितले. पंथातील सर्व महंत, ज्येष्ठ, श्रेष्ठ, आचार्य, संत, भिक्षुक, तपस्विनी, पुजारी, वासनिक सदभक्तांच्या उपस्थितीत श्री. फडणवीस यांचा फेटा घालत, मानचिन्ह देत जाहीर सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमास तानाजी आंधळे, नंदू हांडे, अनिल जाधव, प्रकाश घुगे, मच्छिंद्र सानप, दत्तात्रय गवळी, अरूण महानुभाव, किरण मते, रवी पेखळे, गोविंद कुटे, सुनील सांगळे तसेच शरद ज्ञानेश्वर घुगे, शुभांगीताई नांदगावकर, अजय दराडे, ज्ञानेश्वर निमसे, राहुल बोडके, रमेश सोनवणे, राहुल कुलकर्णी, किशोर ढगे आदी उपस्थित होते.

तुतारी आमच्या पाठीशी राहू द्या

सत्काराला उत्तर देत असताना श्री. फडणवीस यांनी रिध्दपूर येथे उभारण्यात आलेल्या मराठी भाषा विद्यापीठाचा पाच वर्षात आपल्याला कायापालट करायचा आहे. तेथील सर्व साहित्याचे डिजिटायझेशन करून ते शेवटच्या माणसापर्यंत पोचवायचे आहे. फक्त तुमची ‘तुतारी’ आमच्या पाठीशी राहू द्या असे आवाहन केले. तुतारी शरद पवार साहेबांची नव्हे तर, तुमच्या आशीवार्दाची तुतारी पाठीशी असू द्या असे त्यांनी सांगितले, त्यावेळी सभागृहात एकच हंशा पिकला.

नोव्हेंबरची चिंता नाही

नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणूका आहेत. मात्र तुमचा आशीर्वाद पाठीशी असल्याने मला त्याची चिंता नाही. डिसेंबर पासून पुन्हा कामाला सुरवात करू. आगामी पाच वर्षात महानुभव पंथीयांच्या तिर्थस्थळांबाबत एकही काम शिल्लक राहणार नाही असा शब्दही श्री. फडणवीस यांनी यावेळी दिला

Mahant Karanjekar Baba felicitating Deputy Chief Minister Devendra Fadnavis in the gratitude function organized by Akhil Bharatiya Mahanubhava Panth.
Narhari Zirwal News : झिरवाळ विचारणार सरकारला जाब! धनगर आरक्षणावरून सरकारविरोधात करणार आंदोलन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.