Nashik Goda Ghat : पर्यटकांना भिकाऱ्यांमुळे ओंगळवाणे दर्शन; गोदाघाटावरील महापालिकेचे निवाराशेड रिकामेच

Goda Ghat : पवित्र तिर्थस्थानावर येणाऱ्या भक्त भाविकांकडून मिळणारे खाद्य आणि मेजवानी, पैसे मिळण्याच्या आशेने रामतीर्थावर भिकाऱ्यांची गर्दी दिवसागणिक वाढत आहे.
Beggars waiting for devotees on Ram Tirtha.
Beggars waiting for devotees on Ram Tirtha.esakal
Updated on

Nashik Goda Ghat : पवित्र तिर्थस्थानावर येणाऱ्या भक्त भाविकांकडून मिळणारे खाद्य आणि मेजवानी, पैसे मिळण्याच्या आशेने रामतीर्थावर भिकाऱ्यांची गर्दी दिवसागणिक वाढत आहे. भिकाऱ्यांसाठी निवाराशेडची व्यवस्था करूनही या निवारा शेडमधून ते पळ काढून पुन्हा मोकळ्या जागेत येत आहेत. त्यामुळे शेड रिकामेच पडून आहेत. रामकुंड परिसरात भिकाऱ्यांची वाढलेली संख्या आणि त्यामुळे आलेला गलिच्छपणा यांमुळे भाविक आणि पर्यटकांना या तिर्थस्थळाचे ओंगळवाणे दर्शन होत आहे. ( devotees and tourists face problems due to increased number of beggars )

धार्मिक स्थळांवर भिकाऱ्यांचा वावर वाढत आहे. या भिकाऱ्यांसाठी निवाऱ्याची व्यवस्था इंद्रकुंड ते रामकुंड या रस्त्यावरच्या भागात असलेल्या महापालिकेच्या इमारतीत केलेली आहे. ही इमारत निवाराशेड करण्यासाठी रिकामी करून घेतलेली आहे. त्यात भिकाऱ्यांना पाठविण्याची व्यवस्था करूनही ते त्या ठिकाणी थांबत नाहीत. गोदाघाट आणि गाडगे महाराज धर्मशाळेजवळील भागातही निवाराशेडची व्यवस्था असून त्याचा वापर होत नाही.

यशवंतराव महाराज पटांगण, भाजीबाजार पटांगण, म्हसोबा पटांगण, गौरी पटांगण, कपूरथळा, मुक्तेश्वर पटांगण या भागात रात्री उघड्यावर झोपणाऱ्यांची संख्या उन्हाळ्यामुळे वाढत आहे. काही भिकारी दिवसा नजरेस पडतात, सायंकाळ झाल्यानंतर ते दिसत नाहीत. काही वयोवृद्धांना सकाळी सोडून सायंकाळी पुन्हा घेऊन जाण्याची व्यवस्था काही कुटुंबीयांकडून केली जात असल्याची चर्चाही आहे. (latest marathi news)

Beggars waiting for devotees on Ram Tirtha.
Nashik Goda Mahaarti : एकत्रित गोदाआरतीसाठी दोन्ही गट सकारात्मक; तोडगा निघण्याची शक्यता

गोदाघाटाच्या परिसरात सकाळ, दुपार आणि सायंकाळी अन्नदानावेळी भिकाऱ्यांच्या लांब रांगा लागतात. श्राद्ध विधीसाठी येणारे भाविक अन्नदान, वस्त्रदान, वस्तूदान करतात. खाद्यपदार्थ घेऊन गोदाघाटाच्या परिसरात ताव मारीत बसणारे भिकारी कायम नजरेस पडतात. तिन्ही वेळी खाण्यास मिळत असल्यामुळे तसेच पैशांची भीक मिळत असल्यामुळे केवळ वृद्धच नव्हे तर लहान मुले-मुली, तरुण भिकाऱ्यांची संख्या वाढत आहे.

दान केलेल्या वस्तूंच्या चोऱ्या, पळवापळवी यांच्यामुळे त्यांच्यात अनेकदा वाद होतात. तरुण भिकाऱ्यांना येथून घेऊन जाण्यासाठी काही जण येतात. लग्नसराईच्या दिवसात दाट तिथींच्यावेळी या भिकाऱ्यांना वाढपाच्या कामासाठी नेले जात असल्याची चर्चाही रामतीर्थ परिसरात आहे. खाण्याची व्यवस्था आणि थोडेफार पैसे हातात पडत असल्यामुळे थोड्या वेळासाठी ते भिकारी जातात.

प्रशासनाने राबवावा अभिनव उपक्रम

मे २०१८ मध्ये पोलिस आयुक्त डॉ. सिंघल यांनी रामतीर्थावरील भिकाऱ्यांना एकत्र करून त्यांना स्वच्छ करून चांगले कपडे दिले होते. यातील काहींना समुपदेशन करून चांगले शिक्षण व काम करण्यासाठी उद्युक्त केले होते. सुधारणाऱ्यांची संख्या चांगल्यापैकी होती. हा अभिनव उपक्रम मागे पडला आहे. असाच काही उपक्रम प्रशासनाने राबवीत रामतीर्थावर भिकाऱ्यांचे लागलेले ग्रहण कमी करण्याचा प्रयत्न करावा, अशी मागणी भाविकांकडून होत आहे.

Beggars waiting for devotees on Ram Tirtha.
Namami Goda Project: ‘नमामि’ प्रकल्पातही पूररेषेतील 48 स्थळे असुरक्षित! सुशोभीकरण करून करोडोचा खर्च करण्यास विरोध

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.