Saptshringi Gad : लाखावर भाविक आदिमायेच्या चरणी लीन; आदिशक्तीच्या भक्तीत भक्त चिंब

Saptshringi Gad : सप्तशृंगी गडावर रविवारी (ता. ६) लाखावर भाविकांनी आदिमायेच्या दरबारात हजेरी लावली आहे.
Adimaye happy and bright idol of fourth garland in Navratri festival. The windows to the temple from the first step.
Adimaye happy and bright idol of fourth garland in Navratri festival. The windows to the temple from the first step.esakal
Updated on

वणी : सप्तशृंगी गडावर रविवारी (ता. ६) लाखावर भाविकांनी आदिमायेच्या दरबारात हजेरी लावली आहे. नवरात्रोत्सवाचे पुढील पाच दिवस धार्मिक विधींसाठी महत्त्वाचे असल्याने भाविकांच्या गर्दीत वाढ होणार आहे. दुपारी गर्दीत मोठी वाढ होऊन पायऱ्यांपासून धर्मार्थ दवाखानापर्यंत बाऱ्या लागल्या होत्या. सकाळी ट्रस्टच्या कार्यालयात आदिमायेच्या अलंकाराचे पूजन करुन सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. (Devotees in lakhs are immersed in feet of Adimaya saptashrungi devi temple )

आदिमायेस लाल रंगाचे भरजरू महावस्त्र नेसवून सुवर्ण अलंकार घालून साजशृंगार केला होता. पुरोहितांच्या मंत्रघोषात सकाळी सातला देवीची महापूजा झाली. देवीची पंचामृत महापूजा मुंबई उच्च न्यायालयाचे तथा नाशिक न्यायालयाचे पालक न्यायमूर्ती सारंग व्ही. कोतवाल यांनी केली. पंचामृत महाआरती दिल्ली सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्ना बी. वराळे यांनी केली. विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष तथा जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश बाळासाहेब वाघ, विश्वस्त ॲड. ललित निकम, ॲड दीपक पाटोदकर, विश्वस्त संस्थेचे अधिकारी उपस्थित होते. प्रसादालयात सुमारे ३० हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. (latest marathi news)

Adimaye happy and bright idol of fourth garland in Navratri festival. The windows to the temple from the first step.
Navratri 2023: सप्तशृंगी गडावर नवरोत्सवाची तयारी सुरू! प्रशासन लागले कामाला

श्लोक

सुरासंपूर्णकलशं रुधिराप्लुतमेवच ।

दधाना हस्तेपद्माभ्यो कुष्माण्डा शुभदास्तुमे।

या दैवी शक्तीने जागृत झालेल्या प्रेमाने अनुवंपेने साधकामधील राग, द्वेष आदी पळून जातो. आधीच्या पिढीकडून रागीट स्वभाव आला, तरी तो स्वभाव वितळून जातो, असे ऋषी वेदांतामध्ये सांगतात. तमस आणि राक्षसी वृत्ती नष्ट होते. वाईट, अमंगल, अविचार निघून जातात. ही फक्त प्रेम आणि करुणा देते.

Adimaye happy and bright idol of fourth garland in Navratri festival. The windows to the temple from the first step.
Navratri 2024 : पंचामृत महापूजेने नवरात्रोत्सवास प्रारंभ! सप्तशृंगी गडावर तयारी पूर्ण; महिला मंडळासह भाविकांनी फुलले रस्ते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.