सातपूर : वाडीवऱ्हे, गोंदे व इगतपुरी परिसरातील उद्योगांना भेडसावणाऱ्या विजेच्या समस्यांबाबत ‘सकाळ’ने वृत्तमालिका प्रसारित करून लक्ष वेधले होते. ग्रामीण भागात अनेक उद्योजकांनी आपल्या उद्योगासाठी वाढीव विजेची मागणी ‘निमा’च्या माध्यमातून केली होती, त्यानुसार महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी बैठक घेत सकारात्मक निर्णय घेतला. ‘महावितरण’तर्फे वीज वितरण क्षमता दुप्पट करण्यासाठी दिवाळीत तीन दिवस काम करण्यात येईल, अशी माहिती ‘निमा’चे अध्यक्ष धनंजय बेळे यांनी दिली. ()