Narhari Zirwal : धनगर आरक्षणप्रश्‍नी आदिवासी नेते आक्रमक! आमच्या आरक्षणात यायचा हट्ट का? नरहरी झिरवाळ यांचा प्रश्न

Latest Political News : राष्ट्रवादी अजित पवार गटापाठोपाठ भाजपच्या अनुसूचित जमाती मोर्चाचानेही या निर्णयाला विरोध केला आहे. संघटनेच्या पदाधिका-यांनी सामुहिक राजीनामे देण्याची तयारी सुरू केली आहे.
Narahari Jirwal, Hiraman Khoskar, N. D. Gavit
Narahari Jirwal, Hiraman Khoskar, N. D. Gavitesakal
Updated on

नाशिक : राज्य सरकारकडून धनगड आणि धनगर एकच आहेत, असा जीआर काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर शंभूराज देसाईंनी याबाबत माहिती दिली. याचे पडसाद सोमवारी (ता.१६) उमटू लागले असून, भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गट आक्रमक झाला आहे.

विधानसभा उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते नरहरी झिरवाळ यांनी या निर्णयाला विरोध केला आहे. आदिवासींमधून आरक्षण देण्याचा अट्टहास का? असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटापाठोपाठ भाजपच्या अनुसूचित जमाती मोर्चाचानेही या निर्णयाला विरोध केला आहे. संघटनेच्या पदाधिका-यांनी सामुहिक राजीनामे देण्याची तयारी सुरू केली आहे. (Dhangar reservation issue tribal leaders aggressive Question by Narahari zirwal)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.