Nashik Ganesh Utsav 2024 : ढोल पथकांचा दणक्यात सराव गणरायाच्या स्वागतासाठी तयारी

Ganesh Utsav 2024 : सार्वजनिक गणेशोत्सव आणि इतर मिरवणुकीत डीजेवर बंदी आल्यानंतर सर्वच ठिकाणाहून नाशिकच्या ढोल पथकांना मोठी मागणी आहे.
Ongoing practice of the drum corps
Ongoing practice of the drum corpsesakal
Updated on

Nashik Ganesh Utsav 2024 : गेल्या काही वर्षांपासून सार्वजनिक गणेशोत्सव आणि इतर मिरवणुकीत डीजेवर बंदी आल्यानंतर सर्वच ठिकाणाहून नाशिकच्या ढोल पथकांना मोठी मागणी आहे. अवघ्या सव्वा महिन्यावर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी जिल्ह्यातील सुमारे ४३ ढोल पथकेदेखील सज्ज झाली आहेत. शहरातील तब्बल २९ पथकांचा यात समावेश आहे. सर्वच ठिकाणी युवक युवतींपासून शाळकरी मुलांचीदेखील प्रवेशासाठी गर्दी होत असून, १०० पासून ३०० सदस्य असलेल्या या पथकांनी दणक्यात सराव सुरू केला आहे. (Dhol troupe rehearse for Ganesh Utsav )

बाळासाहेब देशपांडे यांनी गुलालवाडी आणि इंदिरानगर येथील अजय मित्रमंडळाचे सचिन कुलकर्णी यांनी लेझीम पथकासाठी म्हणून सुरू केलेला ढोलचा प्रयोग आता नाशिक ढोल नावाने सातासमुद्रापार गेला आहे. २०१२ च्या सुमाराला अरुण मुंगसे यांनी शिवसंस्कृती पथकाची सर्वप्रथम निर्मिती केली. तासानुसार मोठे मानधन आता या सर्वच पथकांना मिळते. नाशिक जिल्हा ढोल ताशा समिती माध्यमातून ही सर्व पथके आपापसांत जोडली गेली आहेत.

आशिष सोनवणे या संघटनेचे अध्यक्ष असून सर्जेराव वाघ उपाध्यक्ष, तर रोहित गायधनी सचिव म्हणून काम बघत आहेत. संघटनेच्या माध्यमातून ढोल पथकांच्या अडीअडचणी सोबतच ढोल पथक प्रीमियर लीग, नववर्षानिमित्त गंगेवर सामुदायिक ढोल वादन, रक्तदान शिबिरे आदी उपक्रम घेतले जातात. प्रत्येक पथकाने आपली स्वतःची सुरक्षा टीम तयार केली आहे. वादनासाठी येणाऱ्या हौशी युवक -युवती, महिला -पुरुष यांचे स्वतंत्र व्हॉट्सअप ग्रुप तयार केले जातात.

प्रत्येकाच्या पालकांचेदेखील स्वतंत्र ग्रुप असतात. सराव किती वाजता आहे, किती वाजता संपणार आहे याची इत्थंभूत माहिती पालकांना दिली जाते. सराव संपल्यानंतर सर्व विद्यार्थी घरी पोचल्यानंतर ते आणि पालक पथक प्रमुखांना त्याबाबत कळवितात. सर्वच पथकांनी सायंकाळी पाच ते आठदरम्यान सराव सुरू केले आहेत. नवीन ताल आणि नवीन थीम कशाप्रकारे वापरतात येईल याचा विचार सुरू आहे. जवळपास सर्वच पथकांचे आगाऊ आरक्षण पूर्ण झाले आहे. (latest marathi news)

Ongoing practice of the drum corps
Ganesh Utsav 2022: डोंबिवलीत विविध धर्मियांनी एकत्र येत केला गणेशोत्सव साजरा..

नारायण जाधव यांचे शिवताल पथक, रोहित गायधनी यांचे शिवाज्ञा प्रतिष्ठान, सर्जेराव वाघ माऊली प्रतिष्ठान, अनिवृद्ध भूधर -तालरुद्र, वीरेन कुलकर्णी -विघ्नहरण, हर्षल फुलदेवरे -शिवाज्ञा, कुणाल भोसले- शिवसाम्राज्य, तुषार भागवत -शिवराय, विपुल धवन- स्वयंभू, विजय पवार- रामराज्य, आशिष सोनवणे- रामनगरी, प्रीतम भामरे- सिंहगर्जना, मिलिंद उगले- शिवतांडव, ऋषिकेश कालेवार- वरद विनायक, विक्रांत सोनवणे- नटनाद आदींसह दिंडोरी येथील योगेश साठे यांचे रुद्र मार्तंड, लासलगाव येथील प्रशांत जाधव यांचे श्रीराम गर्जना यांच्यासह मालेगाव, सटाणा आदी भागातील ढोल पथकांचे सर्वदूर नाव झाले आहे.

''मंडळाच्या गणेश उत्सव मिरवणुकीसाठीच फक्त ढोल पथक वाजवते. परिसरातील सहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना यात प्रवेश देतो. यंदा ढोल पथक सोबत झांज, ध्वज आणि शंखनाद पथकाचीदेखील निर्मिती करत आहोत. २००४ पासून हा उपक्रम मंडळ राबवत आहे.''- सचिन कुलकर्णी, अजय मित्रमंडळ

''मोठ्या संख्येने युवक- युवक विविध ढोल पथकात सहभागी होत आहेत. त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने भविष्यात गट विमा उतरवण्यासाठी पथकांचा विचार विनिमय सुरू आहे. पारंपरिक लोककला सर्वदूर पोचवणे हा मुख्य उद्देश ढोल पथकांचा आहे.''- आशिष सोनवणे, जिल्हाध्यक्ष, नाशिक जिल्हा ढोल ताशा समिती

''माझी मुलगी ढोल पथकात जाते. यानिमित्त काही तास मोबाईलपासून ती दूर राहते. शरीराचा व्यायाम होतो. समाजात वावरत असताना योग्य समज मिळावी आणि दररोजच्या शैक्षणिक कामातून विरंगुळा मिळावा यासाठी तिला पाठवतो. तिच्यात सकारात्मक बदल दिसून येत आहेत.''- अभिजित साठे, पालक

''शिवताल पथकाची सहा वर्षांपासून सदस्या आहे. भारतीय संस्कृती जपली जावी या उद्देशाने मी यात सहभागी झाले आहे. दिवसभराचा ताणतणाव यामुळे दूर होतो. शरीराला सर्वांग सुंदर व्यायाम मिळतो.''- श्रावणी काळे, वाद

Ongoing practice of the drum corps
Maghi Ganesh Utsav: थाटामाटात येणार बदलापूरचा महाराजा, देखाव्यात आरुढ होणार रामाची प्रतिकृती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.