Nashik Agricultural Success: दावचवाडी येथे अंध दांपत्याने फुलविली द्राक्षशेती! ‘तिमिरातून तेजाकडे’ धुमाळ दांपत्याचा संदेश

Agriculture Success : द्राक्षासह इतर पिकांचे डोळस व्यवस्थापन करताना अंध आहे म्हणून दुःख कवटाळून न बसता धुमाळ दांपत्य सकाळपासून शेतीकामात स्वतःला गुंतवून घेतात
Grapes
Grapesesakal
Updated on

पिंपळगाव बसवंत : दिव्यांगाच्या ठायी जिद्द ठासून भरलेली असते, हे नेहमी बोलले जाते. त्याचा प्रत्ययही येतो. असाच आत्मविश्‍वास बाळगत दावचवाडी (ता. निफाड) येथील अंध दांपत्याने द्राक्षाची शेती यशस्वी फुलविली आहे. दृष्टी गमावली असली तरी धुमाळ दांपत्य डोळसपणे द्राक्षासह विविध पीक फुलवीत आहेत. ‘तिमिरातून तेजाकडे’, असा संदेश हे दांपत्य देत आहे. (Nashik Dhumal blind couple grape farm Dawachwadi marathi news)

दावचवाडी (ता. निफाड) येथील पांडुरंग यशवंत धुमाळ (वय ३३ ) यांच्यावर २००१ मध्ये मोठे संकट ओढावले. दोन्ही डोळे अचानक निकामी होऊन जीवन अंधारमय बनले. लग्नाचे वय झाल्याने धुमाळ कुटुंबीयांपुढे पांडुरंग यांच्या विवाहाचा प्रश्‍न सतावत होता. ही चिंता जन्मतःच अंध असलेल्या सवितासोबत रेशीमगाठ बांधल्याने दूर झाली.

वर्षभरात त्यांच्या वैवाहिक जीवनाच्या वेलीवर डोळस मुलगा जन्माला आला. दैवी चमत्कार असा, की अंध धुमाळ दांपत्याला गोंडस बाळ जन्माला येताना दृष्टीने सुदृढ आहे. त्यांच्यासाठी हा मोठा आशेचा किरण ठरला. द्राक्षासह इतर पिकांचे डोळस व्यवस्थापन करताना अंध आहे म्हणून दुःख कवटाळून न बसता धुमाळ दांपत्य सकाळपासून शेतीकामात स्वतःला गुंतवून घेतात. (Latest Marathi News)

Grapes
UPSC Success Story : वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी 'मुद्रा' बनली IAS अधिकारी

पांडुरंग यांची आई सिंधूबाई धुमाळ यांचे मार्गदर्शन त्यांना असते. दोन एकर द्राक्षशेती व इतर पिके त्यांच्या शेतीत बहरलेली आहेत. शिवाय लगतच्या शेतकऱ्यांची दोन एकर जमीन करार पद्धतीने कसतात. द्राक्षबागा, कांदा पिकावर औषध फवारणी, पिकांना पाणी भरणे, खतांचे व्यवस्थापन, जनावरांना चारा टाकणे अशी नियमित कामे ते करतात.

त्यांच्या शेतीकामाच्या कौशल्याचे इतरांना कौतुक वाटते; पण द्राक्ष शेतीतील आव्हाने त्यांच्या समोरही आहे. बाजारभाव, अस्मानी संकटामुळे त्यांची ही शेती तोट्याची बनली आहे. शिवाय आयुष्यातील अंधाराने अनेक संकटे त्यांना झेलावी लागत आहे.

चार वर्षांपूर्वी रस्ता दुरुस्तीचे काम सुरू होते त्या वेळी अंदाज न आल्याने पांडुरंग धुमाळ यांचे दोन्ही हात डांबराने भाजले. त्यात त्यांना गंभीर इजा झाली होती. धुमाळ दांपत्य इच्छाशक्तीच्या जोरावर आयुष्यात आशेचा किरण निर्माण करीत आहे.

Grapes
Success Story: वेदिकाने साकारले आईवडिलांचे स्वप्न! सार्वजनिक बांधकाम विभागात झाली कनिष्ठ अभियंता

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()