Nashik Tree Plantation : दारात 2 झाडे लावा, सावली मात्र येणार! सटाणा येथे वृक्षारोपणासाठी आगळीवेगळी जनजागृती

Nashik News : सटाणा शहरातील एका चौकातील वार्ता फलकावर ‘भाजप येणार की काँग्रेस येणार, अरे शहाण्या दारात दोन झाडे लाव, सावली मात्र नक्की येणार’ या आशयाचे सध्याचं वास्तव मांडणारं केलेलं लिखाण नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे.
The message written on the notice board at Maharaj Chowk on Satana Pathak Maidan to create awareness about tree plantation is attracting everyone's attention.
The message written on the notice board at Maharaj Chowk on Satana Pathak Maidan to create awareness about tree plantation is attracting everyone's attention.esakal
Updated on

Nashik News : यंदा देशात जवळपास ५० डिग्रीपर्यंत तापमानाने उच्चांक गाठला असून, या परिस्थितीत लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू होती. महाराष्ट्रात भर उन्हाळ्यात लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर आता शहर आणि गावखेड्यातील चौकाचौकात रात्री उशिरापर्यंत निवडणुकीत कोणता पक्ष सत्तेवर येईल आणि कोणता उमेदवार विजयी होईल, याची आकडेमोड सुरू झाली. (Different awareness for tree plantation in Satana)

मात्र, वाढता उन्हाळा आणि त्यावरील उपाययोजनांवर कुणीही चर्चा करायला तयार नाही. प्रत्येक गावात पूर्वजांनी जोपासलेल्या झाडांची कत्तल झाल्याने झाडांच्या जंगलाऐवजी सिमेंटची जंगले तयार होऊ लागली आहेत. या परिस्थितीवर सटाणा शहरातील एका चौकातील वार्ता फलकावर ‘भाजप येणार की काँग्रेस येणार, अरे शहाण्या दारात दोन झाडे लाव, सावली मात्र नक्की येणार’ या आशयाचे सध्याचं वास्तव मांडणारं केलेलं लिखाण नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे.

‘झाडे लावा झाडे जगवा’ हे घोषवाक्य फक्त आता बोलण्यापुरते राहिले आहे. कारण, सध्या झाडं लावण्यापेक्षा त्यांची कत्तलच मोठ्या प्रमाणात होते. शहरातील पाठक मैदानावरील महाराज चौकातील सूचना फलकावर करण्यात आलेल्या या लिखाणातून आगळ्या-वेगळ्या पद्धतीने झाडांचं महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला असून, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर झाडांच्या संवर्धनासाठी आगळावेगळा संदेशही देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

सूचना फलकावरील हे लिखाण येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाचं लक्ष वेधून घेत आहे. त्याचा फोटो व्हायरल होत असून लोक आणखी शेअर करत आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत कसमादे परिसरात ४० ते ४५ डिग्री तापमान होते. यावेळी सर्वांनाच झाडाच्या सावलीची किंमत समजली. या निवडणुकीत भाजप, काँग्रेस, शिवसेना, येईल की राष्ट्रवादी.. (latest marathi news)

The message written on the notice board at Maharaj Chowk on Satana Pathak Maidan to create awareness about tree plantation is attracting everyone's attention.
Nashik News : विभागीय स्तरावर वसतिगृहांसाठी 45 कोटी; मंत्री अतुल सावे यांची माहिती

यावर शर्ती पण लागल्या पण ‘झाडे लावा’ यावर मात्र कुणीही बोलले नाही. यानिमित्त ‘कोण येणार’ हे महत्त्वाचे नसून ‘झाडे लावा म्हणजे सावली येईल’ अशी चर्चा सोशल मीडियावर सर्वत्र रंगली आहे. येणऱ्‍या प्रत्येक निवडणुकीत उमेदवारांनी मतदारांना ‘एक झाड-एक मतदान’ हे अभियान राबवून झाडे लावण्याची व ती जोपासण्याची विनंती करावी, त्यामुळे पुन्हा परिसर हरित होण्यास मदतच होईल. नाहीतर यावर्षी ‘अबकी बार ४५ डिग्री पार, अगली बार ५० डिग्री पार’ अशाही प्रतिक्रिया सोशल मीडियावर येत आहेत.

"झाडांच्या कत्तलीमुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडले असून, त्याचे दुष्परिणाम आता बघावयास मिळत आहेत. अशात जास्तीत जास्त झाडे लावणे ही काळाची गरज आहे. झाडे लावणे नव्हे, तर त्यांचे संरक्षण व संवर्धन करणे हीसुद्धा प्रत्येकाची जबाबदारी आहे." - डॉ. सुधीर देवरे, सामाजिक कार्यकर्ते

"प्रत्येकाने किमान तीन भारतीय झाडे दरवर्षी लावून जगवली तर तापमान किमान ३६ अंशपर्यंत येईल. सध्याचे तापमान ४५ अंशांच्या पुढे गेले आहे, जे पुढील पिढीसाठी अजिबात योग्य नाही. पुढील पिढ्यांसाठी आपला ऐतिहासिक वारसा जतन करणे हे जितके गरजेचे आहे, तितके वातावरण आल्हाददायक ठेवणे प्रत्येक भारतीयाचे आद्य कर्तव्य आहे. त्यासाठीच अधिकाधिक झाडे लावावीत." - रोहित जाधव, गडसेवक व वृक्षप्रेमी

The message written on the notice board at Maharaj Chowk on Satana Pathak Maidan to create awareness about tree plantation is attracting everyone's attention.
Nashik News : आश्रमशाळांत पहिल्याच दिवशी गणवेश; ‘आदिवासी विकास’कडून खरेदी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.