Nashik News : मिम्‍सतून मुंबई-आग्रा महामार्गावर मिश्‍कील टिप्पणी; लक्ष वेधण्यासाठी नेटकऱ्यांनी लढविली शक्‍कल

Nashik : दळणवळणाच्‍या दृष्टीने अत्‍यंत महत्त्वाचा असलेल्‍या मुंबई-आग्रा महामार्गाची दुरवस्था सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरते आहे.
Viral memes on social media regarding the plight of the Mumbai-Agra highway.
Viral memes on social media regarding the plight of the Mumbai-Agra highway.esakal
Updated on

Nashik News : दळणवळणाच्‍या दृष्टीने अत्‍यंत महत्त्वाचा असलेल्‍या मुंबई-आग्रा महामार्गाची दुरवस्था सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरते आहे. आंदोलने, रास्‍ता रोकोपासून विविध पातळ्यांवर रस्‍ता दुरुस्‍तीची मागणी होत असताना नेटकऱ्यांनीही मिश्‍कील पद्धतीने रस्‍त्‍याच्‍या दुरवस्थेवर टिप्पणी सुरू केली आहे. सोशल मीडियावर मिम्‍स व्‍हायरल करताना रस्‍त्‍याच्‍या दयनीय अवस्‍थेकडे लक्ष वेधताना अनोखी शक्‍कल लढविल्‍याचे बघायला मिळाले. ()

मुंबई-आग्रा महामार्गाची दुरवस्था झालेली असल्‍याने नाशिक ते मुंबईदरम्‍यानचा प्रवास प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरतो आहे. विशेषतः रस्‍त्‍यावरील खड्डे चुकविताना चालकांना तारेवरची कसरत करावी लागत असून, अनेक वेळा यामुळे अपघातदेखील होत आहेत. तसेच या मार्गावर रस्‍त्‍याच्‍या दुरवस्थेमुळे वाहतूक कोंडीची गंभीर समस्‍या नित्‍याची झालेली आहे. यासंदर्भात औद्योगिक संघटनांनीदेखील आक्रमक पवित्रा घेतला होता. प्रशासकीय पातळीवरही बैठकांमध्ये खडाजंगी बघायला मिळाली होती. (latest marathi news)

Viral memes on social media regarding the plight of the Mumbai-Agra highway.
Nashik News : मनमाड- जळगाव दरम्यानच्या चौथ्या रेल्वेलाईनला चालना!

अनेक प्रवाशांनी रस्‍त्‍याच्‍या दुरवस्थेचे व्‍हिडिओ सोशल मीडियावर व्‍हायरल करताना शासन, प्रशासनाला जाब विचारण्यास सुरवात केली होती. तरीदेखील रस्‍त्‍याची दुरवस्था कायम असल्‍याने आता सोशल मीडियाच्‍या माध्यमातून मिम्‍स व्‍हायरल करताना मार्मिक पद्धतीने टीका केली जाते आहे. शहर परिसरात जोरदार पाऊस पडत असताना, दुसरीकडे मुंबई-आग्रा महामार्गाच्‍या अवस्‍थेबाबत भाष्य करणाऱ्या विनोदी संवादांवर आधारित मिम्‍सचा जणू सोशल मीडियावर पाऊस पडतो आहे.

‘डायलॉग’मधून लक्ष वेधण्याचा प्रयत्‍न

व्‍हायरल होत असलेल्‍या मिम्‍समधील डायलॉग अर्थात संवादातून लक्ष वेधण्याचा प्रयत्‍न नेटकऱ्यांकडून केला जातो आहे. यापूर्वीच सोशल मीडियावर लोकप्रिय ठरत असलेल्‍या मिम्‍समध्ये मुंबई-आग्रा महामार्गाबाबतचा संवाद नमूद करत मिम्‍स व्‍हायरल केले जात आहेत. विशेष म्‍हणजे, व्‍हॉट्‌सॲप ग्रुप, फेसबुकवर अशा मिम्‍सवर कमेंट्‌सचादेखील पाऊस पडत असून, यानिमित्त टीकेची झोड उठविली जाते आहे.

Viral memes on social media regarding the plight of the Mumbai-Agra highway.
Nashik News : स्मार्ट सिटीच्या रस्त्यांवर पाण्याचे तळे; पादचाऱ्यांसह वाहनचालकांची तारांबळ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.