Nashik News : मनमानी वितरणामुळे बादलीभर पाणी मिळणे मुश्‍कील

Nashik : अद्याप उन्हाळ्याची चाहूलही लागली नसताना इंदिरानगरला मात्र कृत्रिम पाणीटंचाईमुळे झळा बसण्यास सुरवात झाली आहे.
Pandavnagari Water tank 
rajendra bachhav
Pandavnagari Water tank rajendra bachhav esakal
Updated on

Nashik News : अद्याप उन्हाळ्याची चाहूलही लागली नसताना इंदिरानगरला मात्र कृत्रिम पाणीटंचाईमुळे झळा बसण्यास सुरवात झाली आहे. चार ते पाच पाण्याच्या टाक्या असूनही संबंधित विभागाच्या कल्पनाशून्य आणि मनमानी वितरण पद्धतीमुळे अनेक ठिकाणी दोन बादली पाणीदेखील मिळणे अवघड झाले आहे. विशेषतः प्रभाग ३० मधील नागरिक कमालीचे त्रस्त आहेत. माजी नगरसेवकांनी पुन्हा एकदा आता जनआंदोलनाचा इशारा दिला आहे.- राजेंद्र बच्छाव (९८८१३७८९५८) (Nashik difficult to get bucket of water marathi news)

विनयनगरपासून विचार केला तर संपूर्ण इंदिरानगरची तहान भागवण्यासाठी वडाळा गाव, सुचितानगर, पांडवनगरी, राजीवनगर येथील चढा पार्क, पार्कसाईड जवळचा तुळजाभवानी, चेतनानगर येथे नुकतेच लोकार्पण झालेल्या जलकुंभातून पाणी वितरणाची सोय आहे. राजीवनगर, पांडवनगरी, पार्कसाईड, राणेनगर येथील पाण्याच्या टाक्या पाथर्डी फाटा येथील पंपिंग स्टेशनवर भरल्या जातात.

वडाळा गाव येथील टाकी उपनगर येथील पंपिंगवरून भरली जाते. सध्या तर मुकणे येथून थेट पाइपलाइनद्वारे काही टाक्या भरल्या जातात. मुबलक पाणी असताना नागरिक कृत्रिम पाणीटंचाईने हैराण आहेत. विशेषतः राजीवनगरचा काही भाग, कलानगर, पांडवनगरी, वडाळा गावातील साठेनगर, संताजीनगर, श्रद्धाविहार, भय्यावाडी, रंगरेज मळा, सदिच्छानगर, चेतनानगरचा काही भाग, श्रीरामनगर, एकता कॉलनी, ओंकार कॉलनी, शिव कॉलनी, बँक कॉलनी, वृंदावन सोसायटी आदी भागात तीव्र पाणीटंचाई आहे.

मोठ्या सोसायटींना दररोज खासगी टँकरद्वारे विकतचे घ्यावे लागत आहे. येथील पाण्याच्या वेळा देखील सकाळी सात, आठ, नऊ तर काही ठिकाणी दुपारी आणि सायंकाळी पाणीपुरवठा केला जातो. ना अधिकाऱ्यांचा अंकुश, ना कोणतेही नियोजन. त्यामुळे सगळीकडे आनंदीआनंद आहे. मन मानेल त्या पद्धतीने वितरण होत असल्याने समस्या उद्भवली असल्याचे नागरिक आणि माजी नगरसेवक सांगतात.

Pandavnagari Water tank 
rajendra bachhav
Nashik News : तपानंतरही बोगद्यातील वाहतूक कोंडी कायम! नागरिकांना रोजचा मनस्ताप

माजी सभागृहनेते सतीश सोनवणे, माजी नगरसेवक ॲड. श्याम बडोदे, सुप्रिया खोडे, डॉ. दीपाली कुलकर्णी यांनी पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना तक्रारी केल्या. मात्र कोणताही फरक पडला नाही. एकमेकांवर आणि सिडको व पूर्व विभाग अशा जबाबदाऱ्या ढकलण्यात धन्यता मानली जात असल्याचा सर्रास आरोप होत आहे. साठेनगर भागात तर आठ दिवसांपासून पाण्याचा थेंब देखील नाही अशी नागरिकांची तक्रार आहे.

पाणी चोरी मोठी समस्या

वडाळा गाव परिसरातील वसाहतींमध्ये मात्र सर्रास पाणी चोरले जात आहे. थेट मोठ्या लाईन पंक्चर करून अनधिकृत जोडण्या घेऊन उद्योग चालू आहे. मात्र महापालिकेच्या अधिकाऱ्यांना याचे काहीही सोयरसुतक नाही. नागरिकांनी फोन केले तर त्याची दखल घेण्याची तसदी घेतली जात नाही. पाणी चोरीवर आजपर्यंत कुठलीही मोठी कारवाई या भागात झालेली नाही.

अधिकाऱ्यांनी मनावर घेतले तर दररोज लाखो लिटर होणारी पाण्याची चोरी पकडली जाऊ शकते, मात्र त्यासाठी कोणतीही हालचाल होत नाही. नियमित पाणीपट्टी भरणाऱ्यांना मोठा मनस्ताप मात्र सहन करावा लागत आहे. ऐन उन्हाळ्यात पाणी संकट हे गडद होत जाणार असल्याने नागरिकांचा रोषही त्या पटीत वाढत जाणार आहे. यापूर्वीदेखील पाण्यासाठी विविध भागात येथे आंदोलने झाली आहेत.

Pandavnagari Water tank 
rajendra bachhav
Nashik News : आरोग्य विद्यापीठाचा आज दीक्षान्त समारंभ; 111 गुणवंत विद्यार्थ्यांना सुवर्णपदके होणार प्रदान

प्रशासकीय राजवटीचा फटका

सध्या महापालिकेत प्रशासकीय राजवट सुरू आहे. लोकप्रतिनिधी असताना त्यांच्या संपर्क कार्यालयात नागरिक नित्यनियमाने तक्रारी करायचे. आताही संपर्क कार्यालय सुरू आहेत. तक्रारींचा ओघदेखील आहे, मात्र अधिकारी आणि कर्मचारी ठराविक लोकप्रतिनिधी सोडले तर कुणालाही जुमानत नाहीत हे वास्तव आहे.

पूर्वी एका फोन कॉलवर प्रभागात येणारे अधिकारी आता येतो, करतो, बघू, करू अशी उत्तरे देतात, अशी खंत माजी नगरसेवकांनी व्यक्त केली आहे. एकंदरीत इंदिरानगर भागातील कृत्रिम पाणीटंचाईच्या प्रश्नाने डोके वर काढले असून त्यात सुधारणा झाली नाही तर मोठ्या जनआंदोलनाला सामोरे जावे लागेल हे नक्की. (latest marathi news)

Pandavnagari Water tank 
rajendra bachhav
Nashik News : पती अंथरुणाला खिळलेला; पत्नीने आर्थिक विवंचनेतून उचलले टोकाचे पाऊल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.