पिंपळगाव बसवंत : संगणक युगात ऑनलाइन व्यवहारात प्रचंड वाढ झाली आहे. यामुळे एटीएमचा वापर जवळपास ७० टक्क्यांनी कमी झाल्याचा अंदाज आहे. यामुळे पिंपळगाव बसवंत शहरातील एटीएमबाहेर कधीकाळी लागणाऱ्या लांबचलाब रांगाकमी झाल्या आहेत. एटीएममुळे बँकांतील तर, युपीआयमुळे एटीएमवरील रांगा हटल्या आहेत. (Nashik Digital Payment Queue at ATM decreased due to UPI news)
पिंपळगाव शहरात सरकारी, खासगी, व्यापारी बँका व सहकारी पतसंस्थांचे मोठे जाळे आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अधिकाधिक सेवा देण्यासाठी बँका तत्परता दाखवितात. त्याचाच एक भाग म्हणून एटीएमची सुविधा दिली. पिंपळगाव शहरात १५ एटीएम मशीन आहेत. पण, या मशीनकडे कुणी फिरकताना दिसत नाही.
कारण, ग्रामीण भागातील भाजीपाला विक्रेत्यांपासून ते मोठ्या शोरूममध्येही युपीआयद्वारे ऑनलाइन व्यवहार होत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांचाही भर आता ऑनलाइन व्यवहारावरच दिसून येतो. घरात किंवा खिशातदेखील रोकड ठेवणे नागरिक टाळतात. त्यामुळे केवळ एटीएममधूनच नव्हे तर बँकेच्या कॅश काउंटरवर असलेली गर्दीदेखील कमी झालेली आहे.
लहान-लहान व्यावसायिकदेखील ग्राहकांकडून युपीआयद्वारेच व्यवहार करताना दिसून येत आहेत. मोबाइलद्वारे बँक अकाउंट कनेक्ट करून, एका सेकंदात व्यवहार होत असल्याने चुटकीसरशी कामे होत आहेत. त्यामुळे एटीएम केंद्रांवरील गर्दी दिसेनासी झाली आहे. (latest marathi news)
चोरटेही झाले अपडेट
ऑनलाईन व्यवहारांमुळे आता बहुतांश नागरिक खिशात किंवा जवळच्या पिशवीत रोकड बाळगत नाही. त्यामुळे चोरट्यांनी आपला मोर्चा महिलांकडे वळविला आहे. विषेतः महिलांच्या दागिन्यांवर, पर्सवर चोरट्यांची नजर असते. बसस्थानक, बाजारपेठ, विवाह समारंभ आदी गर्दीच्या ठिकाणावरून दागिने चोरीचे प्रमाण वाढले आहे.
शिवाय ऑनलाईनच्या काळात चोरटेही अपडेट झाले आहेत. चोरीच्या नवनवीन क्लुप्त्या त्यांनी शोधल्या आहेत. एटीएम कार्डची हेराफेरी, फोन करून लूटमार, लिंक पाठवून खात्यातून पैसे उडविणे, एव्हढेच काय तर एटीएम मशीन फोडून लाखो रूपये चोरी गेल्याच्या घटनाही पिंपळगाव शहरात मागील दोन वर्षांत घडल्या आहेत.
"युपीआयमुळे ऑनलाईन व्यवहार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. रोकड व्यवहार फारसे होत नाही. त्याचा परिणाम सर्वच बँकांच्या एटीएम मशीनमधून रोकड काढण्याच्या प्रमाणात घट झाली आहे."- भोजराज जैन, मुख्य कार्यकारी अधिकारी, पिंमको बँक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.