Dindori Lok Sabha Constituency : कांदा निर्यातबंदी दोष; उत्पादकांचा मतदानातून रोष! डॉ. भारती पवारांना नडला बळीराजा

Lok Sabha Constituency : कांदा निर्यातबंदीचे प्रकरण निवडणुकांच्या मैदानात अंगलट येते की काय, अशी शक्यता दिसताच केंद्र सरकारने निर्यातबंदी उठवून किमान निर्यातमूल्य आणि निर्यातशुल्कचा खुटा मारून दिला होता.
bharti pawar
bharti pawaresakal
Updated on

अण्णासाहेब बोरगुडे : सकाळ वृत्तसेवा

नैताळे : पंतप्रधान नरेंद्र मोदी १५ मे रोजी पिंपळगाव बसवंत येथे आले होते. दिंडोरी मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार डॉ. भारती पवार यांच्या प्रचारासाठी मोदींनी सभा घेतली. याच सभेत एक तरुण उठला आणि मोदींनी कांदा प्रश्‍नावर बोलावं यासाठी घोषणाबाजी करू लागला. त्यामुळे सभेत एकच गोंधळ उडाला. त्यानंतर सभेत बसलेल्या जनतेमधून मोदींनी कांदा प्रश्‍नावर बोलण्याची मागणी केली गेली. (Dindori Lok Sabha Constituency)

तोवर मोदींनी त्यावर ‘जय श्रीराम’च्या घोषणा देत कांदा प्रश्‍नाला डावलण्यासाठी जय श्रीरामच्या घोषणा दिल्या आणि वेळ मारून नेली. हा कांदा प्रश्‍नच भारती पवारांच्या पराभवाला कारणीभूत ठरला. केंद्र सरकारने सहा महिने कांदा निर्यातबंदी करून कांदा उत्पादकांच्या ताटात माती कालवली. कांदा निर्यातबंदीचे प्रकरण निवडणुकांच्या मैदानात अंगलट येते की काय, अशी शक्यता दिसताच केंद्र सरकारने निर्यातबंदी उठवून किमान निर्यातमूल्य आणि निर्यातशुल्कचा खुटा मारून दिला होता.

यामुळे कांदा उत्पादकांच्या भावना तीव्र झाल्या होत्या. हाच राग, द्वेष शेतकऱ्यांनी मतदानातून दाखवून दिला. शेवटी काय तर कांद्याने चक्क डॉ.भारती पवार यांच्या राजकारणाचा बळी घेतला आहे. राज्यातील अनेक मतदारसंघातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या नाराजीचा फटका महायुतीला बसू शकतो. (latest marathi news)

bharti pawar
Dindori Constituency Lok Sabha Election Result : भास्कर भगरे ठरले जायंट किलर! भाजपच्या भारती पवार मोठ्या फरकाने पराभूत

याची जाणीव होताच राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनीही उघड भूमिका घेतली. मोदींना पत्र लिहून कांदा निर्यात धोरणामुळे निर्माण झालेली शेतकऱ्यांची नाराजी मोदींच्या कानावर घातली. कांदा प्रश्‍नावर ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली.

पण, मोदींनी भाषणाच्या सुरुवातीला शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर शब्दही काढला नाही. मग, मध्येच किरण सानप या तरूणाने घोषणाबाजी केली. एकूणच कांदा प्रश्‍न राजकारणात किती महत्वाचा आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

bharti pawar
Dindori Lok Sabha Election 2024 Result : तिसरी नापास ‘सरांना’ 1 लाख मतांचे दान!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.