Dindori Lok Sabha Constituency : डॉ. भारती पवार यांची कार्यकर्त्यांशी चर्चा; पिंपळगावात भास्कर भगरेंची सांगता सभा

Lok Sabha Constituency : महायुतीच्या उमेदवार डॉ. भारती पवार यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा करत मतदारसंघाचा आढावा घेतला. तसेच दुपारनंतर कुटुंबीयांसमवेत वेळ घालवला.
Bhaskar Bhagare meeting in Pimpalgaon
Bhaskar Bhagare meeting in Pimpalgaonesakal
Updated on

Nashik News : दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (ता. २०) मतदानप्रक्रिया पार पडली. त्यानंतर मंगळवारी (ता. २१) महायुतीच्या उमेदवार डॉ. भारती पवार यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा करत मतदारसंघाचा आढावा घेतला. तसेच दुपारनंतर कुटुंबीयांसमवेत वेळ घालवला. दुसरीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांनी सायंकाळी पिंपळगाव (ता. निफाड) येथे कार्यकर्त्यांची सांगता सभा घेत त्यांच्याशी संवाद साधला. (Nashik Lok Sabha Constituency)

दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून भाजपने डॉ. पवार यांची १३ मार्चला उमेदवारीची घोषणा केली. उमेदवारी घोषित झाल्यापासून त्यांनी मतदारसंघात प्रचाराला प्रारंभ केला होता. २ मेस अर्ज दाखल केल्यानंतर खऱ्या अर्थाने प्रचाराचे रण तापले. अखेरच्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होऊन विविध नेत्यांच्या सभा झाल्या.

त्या वेळी रात्र-दिवस त्या प्रचार अन् धावपळ सुरू होती. सोमवारी मतदारसंघात मतदान पार पडले. मतदानप्रक्रिया संपल्यानंतर मंगळवारी सकाळी डॉ. पवार यांनी मतदारसंघातून आलेल्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली. विविध मतदारसंघातील पक्ष पदाधिकाऱ्यांशी त्यांनी चर्चा करत संवाद साधला.

तसेच डॉ. पवार यांनी विधानसभानिहाय कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्याशी फोनद्वारा चर्चा करत मतदानाची आकडेवारी घेतली. कुठे किती मतदान झाले, कोठे काही अडथळा आला का याबाबत त्यांनी माहिती घेतली. दुपारनंतर डॉ. पवार यांनी विश्रांती घेतली. सायंकाळी कुटुंबासमवेत वेळ घालविला. (latest marathi news)

Bhaskar Bhagare meeting in Pimpalgaon
Dindori Lok Sabha Constituency : मतदानात दिंडोरी राज्यात अव्वल; नाशिकमध्ये 61 टक्के मतदान

सांगता सभा घेत मानले आभार

मतदारसंघाच्या दोन टोकांचे अंतर तीनशे किलो मीटर... गुजरात हद्दीपासून ते छत्रपती संभाजीनगर, जळगाव, अहमदनगर या जिल्ह्यांच्या हद्दीला ‘टच’ करणारा दिंडोरी लोकसभा मतदारसंघ. त्यात आदिवासी, ओबीसी, खुल्या प्रवर्गातील मतदारांच्या विविधांगी समस्यांना तोड देत प्रचार करणे म्हणजे उमेदवारांसाठी तारेवरची कसरत असते.

गेल्या दोन महिन्यांपासून तारेवरची कसरत करत असलेले महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांचा प्रचार थांबला आणि सोमवारी मतदानही झाले. मतदानाच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी (ता. २१) सकाळी त्यांनी कादवा सहकारी साखर कारखान्यास भेट दिली.

त्यानंतर शिक्षक संघटनेचे आभार मानत त्यांनी नाशिकमधील केंद्रीय वखार महामंडळाच्या गुदामाला भेट दिली. मतमोजणीची प्रक्रिया समजून घेतली. ज्या ठिकाणी प्रचाराची सांगता सभा झाली, त्याच पिंपळगाव येथील हायस्कूलच्या मैदानावर सायंकाळी पाचला सभा घेत मतदारांचे आभार मानले. या वेळी महाविकास आघाडीचे नेतेही उपस्थित होते.

Bhaskar Bhagare meeting in Pimpalgaon
Dindori Lok Sabha Constituency : तुतारी वाजणार की कमळ फुलणार? निफाड मतदारसंघात आकडेमोडीचे दावे-प्रतिदावे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.