Dindori Lok Sabha Constituency : शरद पवार यांची दिंडोरीत खेळी यशस्वी; अखेर माजी आमदार जे. पी. गावित यांची माघार

Lok Sabha Constituency : अध्यक्ष शरद पवार यांनी सर्वसामान्य एकनिष्ठ भास्कर भगरे यांना उमेदवारी देत सर्वांनाच धक्का दिला होता.
J. P. Gavit, Sharad Pawar
J. P. Gavit, Sharad Pawaresakal
Updated on

Nashik News : महाविकास आघाडीच्या जागावाटपात दिंडोरी लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) वाट्याला आल्यानंतर उमेदवारीसाठी पक्षाकडे भाऊगर्दी झालेली असताना पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सर्वसामान्य एकनिष्ठ भास्कर भगरे यांना उमेदवारी देत सर्वांनाच धक्का दिला होता. (Dindori Lok Sabha Constituency)

घटकपक्ष माकपने उमेदवारी करत महाविकासची डोकेदुखी वाढविली. मात्र गावित यांच्याशी चर्चा करत, कोणत्याही आश्वासनांविना त्यांची माघार घेऊन पवार यांनी महाविकास आघाडी एकसंध ठेवत दिंडोरीच्या पटलावरील राजकीय खेळी यशस्वी केली. सुरवातीस दिंडोरी मतदारसंघातून उमेदवारीसाठी भगरे यांच्याशिवाय कोणाच्याही नावाचा प्रस्ताव नव्हता.

मात्र भाजपने केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांना पुन्हा उमेदवारी देत रिंगणात उतरविले. त्यामुळे भाजपमधील इच्छुक असलेले एन. डी. गावित, ‘उबाठा’ गटाचे माजी आमदार रामदास चारोस्कर यांच्या उमेदवारीसाठी आग्रह झाला. जे. पी. गावित यांनी देखील शरद पवार यांची भेट घेत उमेदवारी मागितली होती.

त्यामुळे राष्ट्रवादीत उमेदवारीसाठी मोठी स्पर्धा झाली होती. परंतु पवार यांनी पक्षाचे एकनिष्ठ असलेले ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे यांच्या पारड्यात वजन टाकत, भगरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे भगरे यांची उमेदवारी देऊन पवार यांनी पहिला डाव टाकला. यातच, महाविकास आघाडीने माकपला दिंडोरीची जागा न दिल्याने नाराज झालेल्या पक्षाने गावित यांना उमेदवारी अर्ज दाखल करून आघाडीला धक्का दिला होता. (Latest Marathi News)

J. P. Gavit, Sharad Pawar
Nashik Lok Sabha Election : गोडसे, वाजे, भगरेंना ‘सोशल’ प्रचार थांबविण्याची नोटीस!

त्यामुळे राष्ट्रवादीचे उमेदवार भगरे यांची अडचण वाढणार होती. गावित यांनी उमेदवारी मागे घेण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लागलीच नाशिक गाठत त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यांना यश मिळाले नाही. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतरही गावित यांनी उमेदवारी मागे घ्यावी, यासाठी शरद पवार गटासह आघाडीकडून प्रयत्न सुरू होते.

मात्र भगरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष पाटील आले असता, त्यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेत भाजपचे कॉन्ट्रॅक्ट घेऊन काहीजण उमेदवारी करतील, असे वक्तव्य पाटील यांनी केले. हा आरोप प्रत्यक्ष नसला तरी, तो माकपच्या जिव्हारी लागला होता. यावर माजी आमदार अनिल कदम, नितीन भोसले.

जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिरीष कोतवाल, जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड यांनी शिष्टाई करत गावित व पवार यांची भेट घडवून आणली. यात गावित आणि पवार यांच्यात चर्चा झाली. पाटील यांच्या वक्तव्य चुकीचे असल्याचे स्वतः पवार यांनी या वेळी मान्य केले. त्यानंतर माकप हा महाविकास आघाडीचा घटक आहे.

J. P. Gavit, Sharad Pawar
Nashik Lok Sabha Constituency : गोडसे, वाजेंसह 2 महाराज नाशिकच्या आखाड्यात; करंजकर, अरिंगळेंसह 5 इच्छुकांची माघार

यात उमेदवारी केल्यास चुकीचा संदेश जाईल, असे पवार यांनी गावित यांना पटवून दिले. याशिवाय पक्षाचे वरिष्ठ नेते सीताराम येचुरी यांच्याशी देखील पवार यांनी चर्चा केली. ही चर्चा यशस्वी झाल्यानंतर रविवारी (ता. ५) पक्षाचे राज्य सचिव उदय नारकर यांनी गावित यांच्या माघारीची घोषणा केली. सोमवारी (ता. ६) गावित यांनी उमेदवारी अर्ज मागे घेत महाविकास आघाडीसोबत राहणार असल्याचे जाहीर केले.

"शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने माघारी घेण्यासाठी विनंती केली. महाविकास आघाडीत माकप सहभागी असल्याने माकप व राष्ट्रवादीचे उमेदवार राहिल्यास संभ्रम निर्माण झाला असता. त्यासाठी पक्षाने माघार घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार उमेदवारी अर्ज मागे घेत असून, महाविकास आघाडीसोबत राहणार आहे." - जे. पी. गावित (नेते, माकप)

J. P. Gavit, Sharad Pawar
Nashik Lok Sabha Election : नाशिक, दिंडोरीत ‘तोफा’ धडाडणार; पंतप्रधानांची सभा 17 ला?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.