Dindori Lok Sabha Constituency : महायुती, महाविकास आघाडीत चुरसपूर्ण लढतीची चिन्हे! पंतप्रधान मोदी, शरद पवार यांच्या सभेचा प्रभाव

Lok Sabha Constituency : दिंडोरी तालुक्याचा सारासार विचार केला तर लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा प्रभाव तर विधानसभा मतदारसंघात संघात आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रभाव आढळून आला आहे ‌.
Prime Minister Narendra Modi and Sharad Pawar
Prime Minister Narendra Modi and Sharad Pawar esakal
Updated on

दिंडोरी : तालुक्याचा सारासार विचार केला तर लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा प्रभाव तर विधानसभा मतदारसंघात संघात आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रभाव आढळून आला आहे ‌.यावेळी मात्र वेगळे चित्र बघायला मिळेल अशी मतदारसंघात चर्चा केली जाते आहे. तालुक्यातील पाणी टंचाई, मराठा आरक्षणावर झालेल्या आंदोलनाचे पडसादही उमटत आहेत. (Dindori Lok Sabha Constituency)

तालुक्यात मुबलक पाणी असतांनाही नियोजनाअभावी स्थानिक जनता मात्र तहानलेली आहे. अशी सारी स्थिती असताना शेवटी प्रचार यंत्रणा कोण चांगली उभी करणार यावर सर्व चित्र अवलंबून आहे. असे असले तरी ही निवडणूक महायुती व महाविकास आघाडी यांच्यातच चुरसपूर्ण लढतीची चिन्हे दिसत आहेत.

यावर्षी भाजीपाल्याला भाव नाही.तरी मोदींसह भाजपाला मानणारा वर्ग तालुक्यात मोठ्या प्रमाणात आहे.तर दुसरीकडे शरद पवार गट सहानुभूतीच्या लाटेवर स्वार असून आज पर्यंत विधानसभा सभेला एकदाच शिवसेना पक्षाला जागा मिळाली होती. इतरवेळेस मात्र राष्ट्रवादी पक्षाचा प्रभाव आजपर्यंत आढळून आला आहे.

बारामतीनंतर दिंडोरी हा राष्ट्रवादी पक्षाला सुरक्षित मतदार संघ वाटतो आहे. उमेदवार तालुक्यातील गोंडेगाव शिंगवे येथील असून जन्मभूमी दिंडोरी तर कर्मभूमी पिंपळगाव बसवंत असल्याने या दोन मतदारसंघात राष्ट्रवादी पक्षाचा प्रभाव आढळून येण्याची शक्यता आहे. दिंडोरी मतदार संघाचा भौगोलिक परिस्थितीचा विचार केला तर पुर्व भाग सदन तर पश्चिम भाग आजही दुर्गमच आहे. (latest marathi news)

Prime Minister Narendra Modi and Sharad Pawar
Dindori Lok Sabha Constituency : मंगळवारपासून दिंडोरीचा राजकीय आखाडा तापणार! महायुती, महाविकास आघाडीचे नेते मतदारसंघात ठोकणार तळ

त्यामुळे प्रचार यंत्रणा कशी राबविण्यात येईल यावरच विजय अवलंबून असतो. मागील निवडणूकीसाठी डॉ.भारती पवार (भाजप) ह्या ५,६७,४७० मताधिक्य मिळवून विजयी झाल्या होत्या तर त्यांचे प्रतिस्पर्धी धनराज महाले (राष्ट्रवादी काँग्रेस) यांना ३,६८,६९९ मतांवर समाधान मानावे लागले होते. त्यावेळी सुध्दा तालुक्यातील वारे येथील उमेदवार महाले यांच्या बाजूनेच होते परंतु त्यांनी पक्षांतर केल्यामुळे तालुक्यातील मतदार नाराज झाले होते.

स्थानिक नेतेही रिंगणात

राष्ट्रवादी नेते शरद पवार यांचा उजवा हात म्हणून ओळखले जाणारे कादवा कारखाना अध्यक्ष श्रीराम शेटे यांचा प्रभाव आजतरी तालुक्यात दिसत आहे. त्याच्या जोरावरच दिंडोरी लोकसभा निवडणूकीसाठी उमेदवार निश्चित केला जातो, त्यामुळे तालुक्यातून भास्कर भगरे यांची निवड झाली आहे.

या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा अध्यक्ष दत्तात्रय पाटील, कादवा कारखाना अध्यक्ष श्रीराम शेटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धुरा खांद्यावर घेतल्याने प्रचाराला चांगलाच वेग आला आहे. तर भारतीय जनता पक्षाचे सुरेश डोखळे, माजी आमदार धनराज महाले, सुनील पाटील आदींनी मतदारसंघातून दौरा करून भाजपची मते कशी वाढतील त्यादृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत.

Prime Minister Narendra Modi and Sharad Pawar
Dindori Lok Sabha Constituency : विरोधातील नेते एकत्र आले, एकसंघ असलेले विलग झाले!

दोन्ही गटातील नेत्यांनी आपली निवडणूक समजून जबाबदारी स्वीकारली आहे, याचा फायदा कोणाला मिळेल हे सांगणे तसे कठीण आहे. मतदार संघातून होणाऱ्या सभा राजकारणाचे गणित ठरवत असतात.

तालुक्यातील प्रमुख प्रश्न -

-तीन वर्षांपासून द्राक्षाला भाव नाही

तालुक्यात पाणी, मात्र स्थानिक जनतेला पाणी नाही

औद्योगिक वसाहतीत स्थानिकांना रोजगार नाही

- सक्षम व परिपूर्ण सुविधा नाहीत.

- रस्त्यांची अवस्था दयनीय

-जुने स्टॅण्ड चौफुली तसेच जानोरी येथील दाहावा मैल येथे उड्डाणपूलाची गरज

यापूर्वी काय झाले...

२०१४

हरिश्‍चंद्र चव्हाण (भाजप) - ७६७०४

डॉ. भारती पवार (राष्ट्रवादी) - ७३७०७

मतदार संख्या -

पुरुष -१,६५,३५७

स्त्री -१,५६,१९४

तृतीयपंथी -७

एकूण -३,२१,५५८

Prime Minister Narendra Modi and Sharad Pawar
Dindori Lok Sabha Constituency : ‘वंचित’च्या मालती ढोमसे खर्च आढावा बैठकीस गैरहजर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.