Dindori Lok Sabha Constituency : शरद पवार की अजित पवारांना दिंडोरी देणार कौल?

Nashik News : भाजपचा बालेकिल्ला असलेल्या दिंडोरीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार आणि शरद पवार या दोघांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
Sharad Pawar and Ajit Pawar
Sharad Pawar and Ajit Pawar esakal
Updated on

Nashik News : राज्यातील बारामती लोकसभा मतदारसंघापाठोपाठ भाजपचा बालेकिल्ला असलेल्या दिंडोरीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार आणि शरद पवार या दोघांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. शरद पवारांना मानणारा नाशिक जिल्ह्यातील सर्वाधिक वर्ग या मतदारसंघात असल्याने अन्‌ अजित पवारांसोबत गेलेले सर्वाधिक आमदार या मतदारसंघातील असल्याने त्यांनी स्वतः लक्ष घालत मतदारसंघासाठी जोर लावला. (Dindori Lok Sabha Constituency)

तर, दुसरीकडे ही जागा भाजपकडून लढविली जात असली तरी अजित पवार गटाचेही या जागेकडे लक्ष होते. या मतदारसंघात अजित पवार गटाचे आमदार अधिक आहेत. त्यामुळे अजित पवार गटातासाठी दिंडोरीची लढत महत्वपूर्ण ठरणार आहे. सन २००८ मध्ये मालेगाव लोकसभा मतदारसंघ पुनर्रचनेत दिंडोरी लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आला.

मालेगाव लोकसभा हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे. दिंडोरी लोकसभा अस्तित्वात आल्यापासून तो भाजपचा गड झाला. सन २००९ च्या लोकसभा निवडणुकीपासून राष्ट्रवादी काँग्रेस या मतदारसंघासाठी जोर लावत आहे. मतदारसंघातील शेतकरी, कांदा उत्पादक शेतकरी हा शरद पवार यांना मानणारा आहे. पवार यापूर्वी अडचणीत सापडले, त्यावेळी याच मतदारसंघामधील विधानसभा मतदारसंघानी त्यांना भक्कम साथ दिली होती.

या भागातील विधानसभा मतदारसंघात गारपीट, दुष्काळ अथवा कांदा प्रश्न आला की, शरद पवार यांनी धाव घेतलेली आहे. त्यामुळेच या मतदारसंघातील दिंडोरी-पेठ, निफाड, येवला, कळवण-सुरगाणा या मतदारसंघांनी सन २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला साथ दिली. शरद पवार यांच्या पाठोपाठ अजित पवार यांनीही या मतदारसंघाकडे कायम लक्ष दिलेले आहे. (latest marathi news)

Sharad Pawar and Ajit Pawar
Dindori Lok Sabha Constituency : सर्वच उमेदवार बनले 'खासदार'! आपल्याच नेत्याचा 'निकाल' लावून कार्यकर्ते मोकळे

राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर मात्र, या मतदारसंघातील निवडून आलेल्या चारही आमदारांनी शरद पवार यांची साथ सोडत अजित पवार यांच्या सोबत गेले. त्यानंतर शरद पवार यांनी येवला, निफाडमध्ये सभा घेत, मतदारांना पुन्हा साद घालण्याचा प्रयत्न केला. तर, अजित पवार यांनी सत्तेत सहभागी झाल्यानंतर स्वतः येथील आमदारांना ताकद देण्याचे काम केले.

लोकसभा निवडणुकीत, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने उमेदवारी निवडीपासून लक्ष घातले. पक्षाशी एकनिष्ठ असलेले शिक्षक भास्कर भगरे यांना रिंगणात उतरविले. मतदारसंघात महायुतीचे प्राबल्य असून त्यातुलनेत महाविकास आघाडीकडे मतदारसंघातील एकही जागा नाही. शरद पवार यांना परिस्थिती अनुकुल नसतानाही त्यांनी कांदा प्रश्न तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर रान उठविले. त्यामुळे भाजपची मोठी अडचण केली.

त्यामुळे प्रचारापासून सुरूवात झालेला कांदा प्रश्न मतदानापर्यंत कायम राहिला. तसा या मतदारसंघात भाजपचा उमेदवार रिंगणात होता. मात्र, महायुतीचा घटक पक्ष असल्याने अन्‌ याच मतदारसंघातील तब्बल चार आमदार आपल्यासोबत आलेले असल्याकारणाने अजित पवार यांनी या मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केले होते.

Sharad Pawar and Ajit Pawar
Dindori Lok Sabha Constituency : डॉ. भारती पवार यांची कार्यकर्त्यांशी चर्चा; पिंपळगावात भास्कर भगरेंची सांगता सभा

त्यासाठी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना पाठवत आमदारांशी चर्चा करून, रणनीती आखली होती. स्वतः अजित पवार या मतदारसंघाचा आढावा घेत होते. त्यामुळे दोघाही पवारांसाठी ही निवडणुक महत्वाची ठरणार आहे.

दोन्ही गटाने मागविला अहवाल

यंदा, राज्यात दिंडोरी लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदान झाले. त्यामुळे या मतदारसंघाचा कौल अजित पवार आणि शरद पवार यांच्यासाठी महत्वाचा असणार आहे. त्यामुळे या दोन्ही गटाच्या वरिष्ठ नेत्यांनी या मतदारसंघातील झालेल्या मतदानाचा अहवाल स्थानिक पातळीवरून मागवून घेतला आहे. मतदारसंघात ६६.७५ इतकी मतांची टक्केवारी झाल्याने वाढलेला टक्का कुणाच्या पथ्यावर पडणार, याबाबत दावे-प्रतिदावे दोन्ही गटाकडून सुरू झाले आहेत.

Sharad Pawar and Ajit Pawar
Dindori Lok Sabha Constituency : दिंडोरी यंदा तरी शरद पवार यांना तारणार का? 3 लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला अपयश

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.