दिंडोरी : दिंडोरी-पेठ विधानसभा निवडणुकीचे ढोल वाजण्यासाठी आता सुरुवात झाली असून, हळूहळू आता निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे. दिंडोरी-पेठ मतदारसंघ हा आदिवासी जमाती (एसटी)साठी राखीव असला तरी संपूर्ण दिंडोरी-पेठ मतदारसंघ पिंजून काढला जातो.
मागील निवडणुकीचा (२०१९) निकाल बघता नरहरी झिरवाळ (राष्ट्रवादी) यांनी एक लाख २४ हजार ८४ मते मिळवून हॅटट्रिक केली होती. तर क्रमांक दोन वर भास्कर गावित यांना ६३ हजार ५४२ मते मिळाली होती. (Dindori Peth Assembly Elections 2024 Candidates preparation started)