ओझर : मविप्र समाज संस्थेच्या माधवराव बोरस्ते विद्यालयाचे कलाशिक्षक मोहन क्षीरसागर यांनी अपंगत्व असताना देखील केवळ काठीच्या सहाय्याने आपल्या सहा शिलेदार मावळ्यांसोबत कळसुबाईचे शिखर तीन तासात सर करून ध्वज फडकविला. त्यांच्या या धाडसाचे कौतुक केले जात आहे. (Nashik disabled teacher hoisted flag on Kalsubai Peak marathi news)
काही दिवसांपूर्वी मोहन क्षीरसागर यांचा अपघात झाला होता. त्यांना ट्रेकिंगची आवड असल्याने दोन वर्षानंतर त्यांच्या मनात कळसुबाई शिखर चढून जाण्याची तीव्र इच्छा झाली. वातावरण खराब असतानाही आपल्या शिलेदारांसह रविवारी (ता. ३१) सकाळी सात वाजता त्यांनी शिखर चढण्यास सुरुवात केली.
एका हाताने काठीचा आधार घेत सकाळी नऊपर्यंत मध्य पॉईंटपर्यंत अतिशय गतीने पुढे सरकले. मात्र, सकाळी साडेनऊनंतर उष्ण चटक्याने शरीर तापू लागले. शेवटी साडेदहा वाजता त्यांनी शिखरावर पोहोचत ध्वज फडकविला. (latest marathi news)
त्यांच्यासोबत ज्येष्ठशिक्षक राजेंद्र शिंदे, बाळासाहेब मोरे, भाऊसाहेब रौंदळ, रवींद्र निकम, बाबासाहेब लभडे, बाबासाहेब गायकवाड यांच्या सहकार्याने त्यांनी हे काम यशस्वीरित्या पूर्ण केले. त्यांच्या या साहसाबद्दल माधवराव बोरस्ते विद्यालयाचे मुख्याध्यापक सोपान वाटपाडे, उपमुख्याध्यापिका सुनीता नलावडे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी कौतुक केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.