Nashik Police : शहरातील शांतता व सामाजिक एकोप्याला छेद देण्याचा प्रयत्न समाजकंटकांकडून नेहमीच होतो. सामाजिक एकोप्याला बाधा अतिसंवेदनशील प्रकरणांमुळे पोचत असल्याने या प्रकरणांच्या हाताळणीसाठी आता पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी विशेष शाखेच्या माध्यमातून तपास सुरू केला आहे. (nashik Discussion of Nashik Pattern of Police marathi news)
त्यांच्या या प्रयत्नांमुळे गेल्या दोन महिन्यांतील प्रकरणांचा तपास पोलिसांकडे नोंद होऊन उकल होत असल्याने आपोआपच अशा प्रकरणांचे भांडवल करणाऱ्या समाजकंटकांना आळा बसला आहे. त्यामुळे आयुक्तांचा हा ‘नाशिक पॅटर्न’ राज्यभर राबविण्याची चर्चा आहे. शहराची शांतता ही तेथील सामाजिक, धार्मिक एकोप्यावर टिकून असते.
सामाजिक एकोप्याला छेद करण्याचा प्रयत्न समाजकंटकांकडून या ना त्या कारणांवरून नेहमीच होतो. त्यामुळे अनेकदा शहराची शांतता धोक्यात येण्याची शक्यता असते. पोलिस यंत्रणेकडूनही कायदेशीर कारवाई केली जाते. यामुळे सामाजिक सलोखा, एकोपा धोक्यात येऊन शहर अशांत होते. अतिसंवेदनशील प्रकरणे अनेकदा पोलिसांपर्यंत पोहोचण्यापूर्वीच काहीजण आपल्या हाती घेतात.
त्यातून विशिष्ट समाजावर आरोप करून त्यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न होत असल्याचे काहीवेळा निदर्शनास येते. तर, दुसरीकडे पोलिसांवरही सामाजिक दबाव आणला जातो. त्यातून बहुतांश वेळा अनुचित प्रकार घडून शहराची शांतता धोक्यात येऊन सामाजिक द्वेषही पसरतो. अशा अतिसंवेदनशील प्रकरणांची कर्णिक यांनी गांभीर्याने दखल घेतली आहे. (latest marathi news)
यासाठी शहर गुन्हे शाखेच्या उपायुक्तांच्या नेतृत्वाखाली विशेष शाखेकडे सर्व अतिसंवेदनशील प्रकरणांचा तपास दिला आहे. शहरातील प्रत्येक पोलिस ठाण्याकडे आलेल्या तोंडी तक्रारीपासून ते गुन्हा दाखल झालेल्या अतिसंवेदनशील प्रकरणांचा तपास विशेष शाखेचे पथक आता करत आहे.
त्यामुळे समाजकंटकांना आळा बसण्यास मदत होणार असून, पोलिसांनाही अशा प्रकरणांचा तपास करणे सोयीचे होणार आहे. तसेच, शहरातील सामाजिक एकोपा, सलोखा टिकवून ठेवणेही पोलिसांना शक्य होणार आहे.
‘सकाळ’कडून पाठपुरावा
अलीकडे शहरातील अतिसंवेदनशील प्रकरणांमुळे सामाजिक द्वेष पसरून दोन समाजांमध्ये तंटा उभा राहून त्याचा ताण सामाजिक एकोप्यावर येतो, अशी अतिसंवेदनशील प्रकरणे हाताळण्यासाठी स्वतंत्र तपास यंत्रणा कार्यान्वित केल्यास, अशा घटनांच्या नोंदी घेत पोलिसांनी त्याची गांभीर्याने दखल घेतली तर समाजात दुही माजविणाऱ्या समाजकंटकांना आळा बसून सामाजिक, धार्मिक एकोपा आणि शहरातील कायदा व सुव्यवस्था टिकून राहील, यासाठी या उद्देशाने शहर पोलिस आयुक्तालयाकडे ‘सकाळ’च्या माध्यमातून पाठपुरावा करण्यात आला होता.
संवेदनशील प्रकरणे
पोलिस ठाण्यांकडे आंतरजातीय-आंतरधर्मीय विवाहसंदर्भात येणाऱ्या तक्रारी, अर्ज, दाखल होणारे गुन्हे; तसेच गोवंश वाहतूक, गोमांस विक्रीसंदर्भातील गुन्हे, बलात्कार, महिलांचे अपहरण, धर्मांतर अशा अतिसंवेदनशील प्रकरणांचा तपास पोलिस आयुक्तांच्या
मार्गदर्शनाखाली नेमलेल्या विशेष शाखेमार्फत होत आहे. शहर आयुक्तालय हद्दीत गेल्या दोन महिन्यांत आंतरधर्मीय विवाहाची एकही तक्रार वा गुन्हा नोंद नाही तर, गोवंश वाहतूक व गोमांस विक्रीचे १६ गुन्हे दाखल आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.