नाशिक : विधानसभा निवडणुकीचा प्रचार सोमवारी थंडावला आहे. पंचवटीतील वाघाडी नदी पुलावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे उमेदवार गणेश गिते आणि भाजप उमेदवार राहुल ढिकले यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाला. यात गीते यांच्या कार्यकर्त्यांची स्कॉर्पिओ गाडी फोडल्याची माहिती समजत आहे. यातून धन शक्तीविरोधात जनशक्ती अशीच यावेळची निवडणूक असल्याची चर्चा नागरिकांमध्ये जोरात सुरू होती.