Nashik News : महायुतीमधील आमदारांमध्ये निधी वाटपावरून राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी टीकास्त्र सोडले. आता फक्त निधी वाटपावरून वाद झाला आहे. उद्या एकमेकांचे कपडे फाडू नये म्हणजे झाले. ही परिस्थिती लवकरच येईल, अशा शब्दांत त्यांनी टीका केली. महाराष्ट्राची तिजोरी कशाप्रमाणे लुटता येईल आणि सत्ताधारी आमदारांना कसे निधी वाटप केले जाईल, याचा विचार सुरू आहे. निधी वाटपावरून आमदार माणिकराव कोकाटे सत्य बोलत आहेत. (Dispute over funds Criticism of Leader of Opposition Vijay Wadettiwar for mahayuti )
ते काही चुकीचे बोलत नाही. सरकारला जनतेचे काही घेणे देणे नाही. सत्ता आणि सत्तेतून पैसा आणि पुन्हा पैशातून सत्ता, अशा पद्धतीने फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे. महाराष्ट्रातील इतिहासातील सर्वांत भ्रष्ट सरकार म्हणून या सरकारची नोंद झाली असल्याची टीकाही त्यांनी केली. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार बुधवारी (ता. २४) नाशिक जिल्हा दौऱ्यावर होते. त्यावेळी श्री. वडेट्टीवार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
केंद्रीय अर्थसंकल्पातील घोषणांबाबत विचारले असता, श्री. वडेट्टिवार म्हणाले, की केंद्राचा अर्थसंकल्प म्हणजे धूळफेक आहे. ज्या लोकांनी पाठिंबा दिला. त्यांची मर्जी सांभाळणारे बजेट आहे. सत्ता येणार नाही माहीत असल्यानेच महाराष्ट्राला काहीच दिले नसल्याची टीका त्यांनी केली. केंद्र आणि राज्य सरकारने मिळून शेतकऱ्यांना खड्ड्यात घालण्याचे काम केले आहे. फक्त मोठ्या घोषणा करणे, मात्र त्याची पूर्तता न करणे ही सरकारची भूमिका आहे. कांद्याचे मोठे नुकसान राज्यात झाले. (latest marathi news)
मात्र, महाराष्ट्राला एक आणि गुजरातला वेगळा न्याय दिला जातो. महायुतीच्या शेतकरीविरोधी धोरणांमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. कांदा निर्यातबंदी, शेतमालाला भाव नाही, हमीभाव नाही, वाढता कर्जाचा बोजा, खते, बियण्यांचे वाढलेल्या दरामुळे शेतकरी देशोधडीला लावण्याचे काम या सरकारने केले. विधानसभा निवडणुकीत शेतकरी त्यांना त्यांची जागा दाखवतील, असे त्यांनी सांगितले. सगळे उद्योग गुजरातला पळवून नेले जात आहेत. महाराष्ट्र सरकार गुजरातकडे गहाण आहे, अशी गंभीर टीका त्यांनी केली.
आमच्यावर खापर फोडू नका
मराठा आरक्षणाबाबत बोलताना श्री. वडेट्टीवार म्हणाले, की जरांगे पाटील यांच्या मागणीची दखल घेऊन त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या पाहिजेत. ओबीसीतून आरक्षण द्यायचे की नाही, हे सरकारने सांगावे. आम्हाला काय विचारता. तुम्ही जरांगे यांना आश्वासन दिले ते पूर्ण करा. आम्ही बैठकीला आलो नाही, म्हणून आमच्यावर खापर फोडू नका. तुम्ही मराठा समाजाला आरक्षण देणार, असे सांगितले होते. ते आश्वासन पूर्ण करा. आम्ही तुमचा सत्कार करू. आम्ही काय करायचे ते सत्ता आली की सांगू, असेही त्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.