Nashik ZP News : जि. प.च्या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदानावर बियाणे वाटप

Nashik News : जिल्हा परिषदेने यंदा सेस योजनेंतर्गत ५० टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना भुईमूग, तूर, मूग, उडीद यांचे बियाणे देण्यात येणार आहे.
seeds
seedsesakal
Updated on

Nashik News : जिल्हा परिषदेने यंदा सेस योजनेंतर्गत ५० टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना भुईमूग, तूर, मूग, उडीद यांचे बियाणे देण्यात येणार आहे. त्यानुसार १९ टन बियाणे उपलब्ध करून देण्यात आले असून, जिल्ह्यातील प्रत्येक पंचायत समिती कार्यालयातून शेतकऱ्यांना या बियाण्यांचे वितरण सुरू झाले आहे. पहिल्या दिवशी पाच टन बियाण्यांचे वाटप झाले असल्याचे बोलले जात आहे. (Distribution of seeds on 50 percent subsidy to farmers under scheme of ZP)

खरीप हंगामात जिल्ह्यातील सर्वच प्रवर्गातील शेतकऱ्यांना कमी दरात गुणवत्ता असलेले कडधान्य, भुईमूग पिकाचे बियाणे उपलब्ध व्हावे, यासाठी जिल्हा परिषदेने सेस योजना राबविली आहे. यासाठी १५ तालुक्यांसाठी उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. भुईमूग बियाण्यांची २० किलोची पिशवी असून, ११ हजार २४० किलो बियाणे उपलब्ध करण्यात आले आहे.

तूर, मूग, उडीद बियाण्यांची प्रत्येकी दोन किलोची पिशवी असून, अनुक्रमे एक हजार ९०४, दोन हजार ६६६, तीन हजार १५६ किलो बियाणे उपलब्ध करून देण्यात आले आहे. प्रथम विहित नमुन्यात बियाणे मागणीचा अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याला प्राधान्याने बियाणे देण्यात येणार आहे. अर्जाबरोबर त्यांना सातबारा उतारा व आठ अ चे अद्ययावत उतारे जोडणे आवश्यक आहे.

एका लाभार्थी शेतकऱ्याला जास्तीत जास्त एक हेक्टरसाठी आवश्यक बियाणे मिळेल. चालू आर्थिक वर्षात लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना दुबार लाभ घेता येणार नाही. बियाणे वाटपाचे तालुकानिहाय लक्ष्यांक जिल्हा परिषदेने निश्चित केले आहेत. (latest marathi news)

seeds
Nashik Onion News : कांद्यावरील निर्यात उठवावी, कांद्याला हमी भाव द्यावा; काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कोतवाल यांची मागणी

असे मिळेल ५० टक्के अनुदान

योजनेत ५० टक्के अनुदानावर तूर, मूग, उडीद, भुईमूग व हरभरा बियाणे मिळतील. उर्वरित ५० टक्के वसूल करावयाची रक्कम गटस्तरावर बियाणे वाटप करण्यापूर्वी शेतकऱ्यांकडून वसूल करून पुरवठादार संस्थेच्या नावे डी. डी. धनादेश काढून या कार्यालयात पाठविण्यात यावा. अनुदानाचे प्रस्ताव घटस्थरावर संपूर्ण कागदपत्रांसह दप्तरी ठेवावेत.

वाटप रजिस्टर अद्ययावत ठेवण्यात यावे. बियाणे वाटप केल्यावर तसेच पेरणी झाल्यावर कृषी अधिकारी विस्तार अधिकारी (कृषी) यांनी १०० टक्के क्षेत्रीय तपासणी करून त्याचा अहवाल या कार्यालयास सादर करण्यात यावा. तसेच, उपयोगीता प्रमाणपत्र सादर करण्यात यावे.

अशा आहेत बियाण्यांची किमती

या योजनेंतर्गत महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ यांच्याकडून हे बियाणे पुरविण्यात येत आहे. यात तूर बियाण्यांची दोन किलोची बॅग असून, तिची किंमत ४२० रुपये आहे; तर शेतकऱ्यांना केवळ २१० रुपयांना मिळेल. मूग बियाण्यांची दोन किलोची बॅग ४५० रुपयांना असून, शेतकऱ्यांना त्यासाठी २२५ रुपये भरावे लागणार आहेत. उडीद बियाण्यांची दोन किलोची बॅग ३८० रुपयांना असून, शेतकऱ्यांना ती १९० रुपये रुपयांत मिळेल. भुईमुगाची २० किलोची बॅग तीन हजार २०० रुपयांना आहे. शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदानावर एक हजार ६०० रुपयांना मिळेल.

seeds
Nashik Teacher Constituency: शिक्षक मतदारसंघात चौरंगी लढत; नाशिक विभागातील 5 जिल्ह्यांत 69 हजार मतदार बजावणार हक्क

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.