Textbooks
Textbooks esakal

Nashik News : सिन्नरमधील 36, 234 विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वितरण

Nashik News : तालुक्यातील पहिली ते आठवीतील ३६ हजार २३४ विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी शालेय पुस्तक वितरीत करण्यात येणार असून शालेय गणवेशाचे घोंगडे भिजत पडल्याचे दिसून येते.
Published on

विकास गिते : सकाळ वृत्तसेवा

सिन्नर : तालुक्यातील पहिली ते आठवीतील ३६ हजार २३४ विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी शालेय पुस्तक वितरीत करण्यात येणार असून शालेय गणवेशाचे घोंगडे भिजत पडल्याचे दिसून येते. मराठी व सेमी इंग्रजी माध्यमाची शंभर टक्के पुस्तके सिन्नर पंचायत समितीच्या शिक्षण विभागाला प्राप्त झाले असून पुस्तकांचे केंद्र स्तरापर्यंत वाटप करण्यात आले आहे.

पहिली ते आठवीच्या सेमी इंग्रजीसाठी मागणीनुसार २३ हजार ८२५ पुस्तक संच तर मराठी माध्यमाची ११,४१६ पुस्तके प्राप्त झाली असून यानंतर त्याचे वितरणही करण्यात आले आहे. औद्योगिक क्षेत्र असल्याने कामगार तसेच शेतकरी वर्ग तालुक्यात मोठ्या प्रमाणावर असल्याने खासगी शाळांबरोबरच सरकारी शाळाही प्रत्येक गावात असल्याने वाड्या- वस्त्यांमधील अनेक विद्यार्थी शाळेत येत असतात .

सिन्नर तालुक्यात जिल्हा परिषदेच्या २०८ शाळा असून यामध्ये ७५ लाभार्थी संस्थेच्या शाळा आहेत. सिन्नर तालुका हा दुष्काळी असल्याने येथे सतत अनेक समस्यांना नागरिकांना तोंड द्यावे लागते .अनेक शाळांची देखभाल उत्तम असल्याने किरकोळ दुरुस्ती, शाळा वर्ग स्वच्छता, शालेय मैदान व परिसर स्वच्छता.

पिण्याच्या पाण्याच्या टाक्या यावर शैक्षणिक विभागातील अधिकाऱ्यांनी व शिक्षकांच्या मदतीने 5५ ते १२ जून या कालावधीत ही सर्व कामे आटोपून घेतली आहेत. शिक्षक बदलीसाठी तालुकास्तरावर ७५ अर्ज प्राप्त झाले असून. त्यावर छाननी करून वरिष्ठांकडे पाठवण्याचे काम सुरू आहे. (latest marathi news)

Textbooks
Nashik NMC News : अपघातमुक्त शहरासाठी स्वतंत्र वाहतूक आराखडा; उपाययोजना सुचवून नियमावली

तसेच विद्यार्थ्यांचे स्वागत पहिल्या दिवशी बैलगाडीतून तसेच गुलाब पुष्प व नवीन पाठ्यपुस्तके देऊन करण्यात येणार आहे. तसेच मागील वर्षी बूट मोजे याचे वाटप करण्यात आले होते. यावर्षी गणवेश तसेच बूट मोजे वरिष्ठ कार्याच्या सूचनेनुसार वाटप करण्यात येणार असून बूट मोजे खरेदीचा अधिकार शालेय शिक्षण समितीकडे देण्यात आले आहेत.

"सिन्नर तालुक्यातील सर्व शाळा या सुस्थितीत असून थोड्याफार प्रमाणात शाळा दुरुस्तीची किरकोळ कामे मागील आठवड्यात पूर्ण करण्यात आले आहेत. शाळेच्या पहिल्या दिवशी मुलांचे गुलाब पुष्प, चॉकलेट देऊन बैलगाडीतून स्वागत करण्यात येणार आहे. पहिल्या दिवशी पुस्तके देण्यात येणार असून गणवेशाचे कापड मात्र अद्याप उपलब्ध झाले नसल्याने त्याची वाट बघावी लागणार आहे." - राजेश डामसे, गटशिक्षणाधिकारी, सिन्नर

Textbooks
Nashik Kharif Season : जिल्ह्यात खरिपाच्या पेरण्यांची प्रतीक्षा!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.